वृद्धेच्या खूनप्रकरणी एकाला अटक

0

प्रकाशा । मनोरूग्ण वृध्देवर अतिप्रसंग करून तिचा खून केल्याप्रकरणी एका तरूणास अटक करण्यात आली. त्यास दि.9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

लिंभोरा ता. कुकरमुंडा (जि.तापी, गुजरात) येथील 75 वर्षीय मनोरूग्ण वृध्द झुरीबाई जत्र्या भिल हिचा मृतदेह दि.3 डिसेंबर रोजी सकाळी जि.प. शाळेसमोर यात्रेकरू निवासस्थानाच्या ओटयावर विवस्त्रावस्थेत आढळून आला.

त्यानंतर तिचा भाचा जि.प. सदस्य अमृत नामदेव भिल (निंभोरा ता. कुकरमुंडा) यांनी फिर्याद नोंदवली. त्यानुसार खून आणि अतिप्रसंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या परिसरात शोध घेतला असता याच निवासस्थानाच्या परिसरात सुरेश निंबा पाडवी (38) रा.प्रकाशा ता. शहादा आढळून आला. त्याच्या अंगावर तसेच पोटावर ओरखडे आहेत. त्यामुळे त्याला संशयावरून अटक करण्यात आली.

उपनिरीक्षक अर्जुन नेरकर तपास करत आहेत. तपासासाठी संशयीताच्या अंगावर आढळलेला मोठा केस, तिच्या नखात आढळलेले कणसह अन्य बाबी तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी सुरेश पाडवीला अटक केली आहे. तो लाकुड तोडण्याचे गोळा करण्याचे काम करतो. तो मनोरूग्ण आहे. त्याची आईदेखील मनोरूग्ण आहे.

त्याच्या अंगावरील ओरखडे लाकुड तोडण्याचे असावेत असा अनेकांचा कयास आहे. त्याने हा प्रकार केला असण्याची शक्यता कमी आहे. पोलीस तपासात याबाबत योग्य बाब उघड येईल.

LEAVE A REPLY

*