बस-कारच्या धडकेत एक ठार

0

नंदुरबार । नंदुरबार- आष्टे दरम्यान एस.टी. बस-इंडीगोच्या झालेल्या अपघातात कार चालकचा जागीच मृत्यू झाला. तर एस.टी.तील सहा प्रवाशी जखमी झाले आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार आगाराची एस.टी. बस (क्र.एम.एच.14- बी.टी.2128) ही नंदुरबारहून नाशिक येथे जात असतांना आष्टे- नंदुरबार दरम्यान ओझर्टेे फाटयाजवळील वळण रस्त्यावर छडवेलकडून येणार्‍या इंडीगो (क्र.एम.एच.39- जे. 1326) कार चालक ॠषीकेश रविंद्र जगदाळे रा.खोंडामळी (नंदुरबार) याचा जागीच मृत्यू झाला.

बसमधील नवघनभाई लालजी भरवाड, गीता लक्ष्मण भरवाड, मंगलाबाई हरचंद मराठे, रविंद्र रामसिंग ठाकरे, महेश बाजीराव जाधव, संगिता सुनिल वासळे यांना दुखापत झाली.

जखमींना नंदुरबार उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सचिन भिमराव नांद्रे (प्रभाकरनगर,साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक स्वरूपसिंग लालसिंग चौरे रा.वाघाळे (ता.नंदुरबार) याच्या विरोधात नंदुरबार पोलीस ठाण्यात भादंवि 304 (अ) 279, 337, 338, 427 मोटर वाहन कायदा क्र.184 134/ 187 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय शेवाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*