मुख्यमंत्री 8 डिसेंबरला सारंगखेड्यात

0

सारंगखेडा, ता.शहादा । येथे चेतक महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस दि.8 डिसेंबर रोजी सारंगखेडा येथे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभुंच्या यात्रौत्सवानिमित्त गेल्या वर्षापासून चेतक महोत्सवास सुरूवात झाली आहे. महिनाभर या महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

या चेेतक महोत्सवाला दि.8 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस येणार आहेत. सारंगखेडा येथील घोडे बाजाराला जागतिक दर्जावर नेण्यासाठी मुख्यमंत्री ना.फडणवीस व पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात प्रसिध्द असलेली घोडे बाजार हा विदेशातही प्रसिध्द केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ना.फडणवीस हे सारंगखेडा येथील कार्यक्रम आटोपून नंदुरबार येथे नगरपालिका निवडणूकीनिमित्त आयोजित जाहीरसभेलाही संबोधीत करणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*