तळोद्याचे मतदान 16 डिसेंबरला होणार? उमेदवारांवर घेतलेल्या हरकतींचा परिणाम, आज माघारीची मुदत

0

नंदुरबार । तळोदा येथील नगरपालिका निवडणूकीत उभ्या असलेल्या उमेदवारांवर घेण्यात आलेल्या हरकतींमुळे उमेदवारांना प्रचाराला पुरेसा कालावधी मिळावा यासाठी नगरपालिका निवडणूक दि. 16 डिसेंबर रोजी होणार असल्याची चर्चा आहे.

मात्र, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, निवडणूकीतून माघार घेण्यासाठी हरकती घेतलेल्या प्रभागांमधील उमेदवारांना उद्या दि. 6 डिसेंबरची मुदत देण्यात आल्याचे समजते.

तळोदा पालिकेच्या निवडणूकीसाठी दाखल करण्यात आलेल्या काही उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्यात. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत बबनराव माळी, जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी व रोहित भरत माळी यांच्या अर्जावर भाजपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय छबुलाल परदेशी यांनी हरकत घेतली.

तसेच काँग्रेसचे प्रभाग क्र. 1 ब मधील नगरसेवक पदांचे उमेदवार योजना भरत माळी यांच्या अर्जावर भाग्यश्री योगेश चौधरी यांनी हरकत घेतली.

प्रभाग क्र. 9 ब मधील संजय बबनराव माळी यांच्या अर्जावर किरण अशोक सुर्यवंशी यांनी हरकत घेतली. प्रभाग क्र. 5 ब मधील अपर्णा अनिल माळी यांच्या अर्जावर अंबिका राहुल शेंडे यांनी हरकत घेतली होती.

मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी या सर्व हरकती फेटाळून लावत चारही उमेदवारांचा अर्ज वैध ठरवला होता. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या या निकालावर विरोधी गटाकडून अजय परदेशी, किरण सूर्यवंशी व भाग्यश्री चौधरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयात गेल्या आठवडयापासून या अपिलावर शहादा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु होती. या अपिलावर सुनावणी झाली. त्यात काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत माळी व संजय माळी यांचा अर्ज वैध ठरला आहे. तर सौ.योजना भरत माळी यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.

सौ.माळी यांचा अवैध ठरल्याने प्रतिभा दगूलाल माळी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे संबंधीत उमेदवारांना माघार घेण्यासाठी 7 डिसेंबरपयर्ंत मुदत देण्यात आली होती.

त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येणार होते. परंतू या उमेदवारांना प्रचारासाठी माघारीनंतर किमान आठ दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मागणी आहे.

त्यामुळे 7 ते 15 डिसेंबरपर्यंत या उमेदवारांना प्रचार करता येणार असल्याने मतदान हे दि. 16 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. तर मतमोजणी दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि. 17 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रभागातील उमेदवारांना माघारीसाठी उद्या दि. 6 रोजी अंतीम मुदत देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर आठ दिवस म्हणजे दि. 15 किंवा 16 डिसेंबरला तळोद्याचे मतदान होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार व नवापूर येथील मतदान हे दि. 13 डिसेंबरलाच होणार आहे. परंतू निकाल मात्र 14 डिसेंबरला न लागता तळोदा पालिका निवडणूकीच्या निकालाबरोबर लागण्याचीही शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*