नंदुरबार पालिका निवडणुकीसाठी सहा प्रभागाच्या उमेदवारांना चिन्ह वाटप

0

नंदुरबार ।  नंदुरबार येथील नगरपालिका निवडणुकीसाठी सहा प्रभागातील उमेदवारांना आज मतदान चिन्हाचे वाटप करण्यात आले. पालिका निवडणुकीसाठी सहा प्रभागातील उमेदवारांच्या अर्जांची छाननी करतांना नामांकन रद्द करण्यात आले होते.

यासाठी उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे या सहा प्रभागांसाठी माघारीची मुदत वाढ करण्यात आली होती. आज रोजी सहा प्रभागातील उमेदवारांना निवडणुक चिन्हाचे वाटप करण्यात आले.

यात प्रभाग क्र. 7 अ. प्रभाग क्र. 13 अ., प्रभाग 14 अ., प्रभाग क्र. 15 अ., प्रभाग क्र. 16 ब. मधील उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना व अपक्षांना चिन्ह वाटप करण्यात आले.

काँग्रेसच्या उमेदवारांना हाताचा पंजा, तर भाजपाच्या उमेदवारांना कमळाचे फुल उमेदवारी चिन्ह म्हणून देण्यात आले. या प्रभागातील अपक्ष उमेदवारांना पाटी, डिझेल पंप, आईस्क्रिम, पतंग, शिट्टी हे निवडणुक चिन्ह देण्यात आले.

चिन्ह वाटप झाल्यामुळे या उमेदवारांचा प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत हे सर्व उमेदवार चिन्हाविना प्रचार करतांना दिसत होते. आज मात्र चिन्हासह प्रचार करण्यात आला. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

*