पावसामुळे प्रचार रॅली व मिरवणुका रद्द

0

मोदलपाडा । तळोदा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरवात झाली होती. परंतू अचानक आलेल्या पावसामुळे निवडणूक प्रचारावर विरजण पडले आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या रॅल्या व मिरवणुका रद्द झाल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

तळोदा नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला 1 तारखेपासून जोरदार सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. आज काँग्रेस व भाजपाच्या मिरवणूक व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

अचानक आलेल्या पावसामुळे या दोन्ही पक्षांचा हिरमोड झाला. या मिरवणूका व रॅली एकदिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तळोदा नगरपालिका निवडणुकिला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रचार करत आहेत त्यात रिक्षा फिरवणे, डिजिटल वाहन फिरवणे, अश्या व अनेक प्रचाराच्या युक्तयाचा वापर करून प्रचार करण्यात येत आहे.

शहरात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. सकाळी व रात्री थंडीमुळे काहीशी मर्यादा येत आहे. मात्र त्यावर मात करून प्रचाराचे उद्दीष्ठ पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.

अद्यापपर्यंत शहरात स्टार प्रचारक उपलब्ध न झाल्यामुळे शहरातील नावाजलेला स्मारक चौक व आनंद चौकांमध्ये सभा होत नसल्याने पक्षनेते व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तत्पूर्वी शहरातील सर्व प्रभागात कॉर्नर सभा घेऊन मिरवणुका सुरू केल्या आहेत.

त्यात नगराध्यक्ष पदाचा उमेदवारासह त्या त्या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार सहभागी होत आहेत. पक्ष कार्यकर्त्यांना जमवून सकाळी 8 वाजेपासून दुपारपर्यंत सर्व प्रभाग पिंजून काढले जात आहेत.

LEAVE A REPLY

*