पावसाच्या संततधारेमुळे नुकसान

0

नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यात आज दिवसभर संततधार पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे मिरचीसह अनेक पिकांचे नुकसान झाले. या पावसामुळे सारंगखेडा येथील यात्रेवर परिणाम झाला असला तरी घोडेबाजार मात्र तेजीत होता.

ओखी वादळामुळे उत्तर महाराष्ट्रात तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्यात वर्तविली आहे. आज सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली.

शहरात पावसामुळे एकच धावपळ उडाली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळे धान्याची पोती ओली झाली. त्यासोबत नंदुरबार शहरात स्वेटर घालून फिरणारे नागरीकांना आज छत्री घेवून बाहेर पडावे लागत होते. नंदुरबार शहरासह जिल्हाभरात आज दिवसभर पावसाचा जोर कायम होता.

सारंगखेडा
सारंगखेडा येेथील एकमुखी दत्त प्रभुंच्या यात्रेला पावसामुळे भाविकांची संख्या रोडावली होती. त्यामुळे यात्रेतील विक्रेत्यांना व पालखीसह इतर व्यवसायीकांना फटका बसला.

घोडे बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या यात्रेत पावसामुळे नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसामुळे यात्रेला आलेल्या भाविकांचीही तारांबळ उडाली.

असे असले तरी अशा पावसात घोडे शौकीनांनी यात्रेला हजेरी लावली. घोडेविक्रीत मात्र तेजी दिसून आली. आजही घोडेबाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली.

कळंबू
कळंबू ता. शहादा (वार्ताहर) कळंबू सह परिसरात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

अचानक आलेल्या बेमोसमी पाऊसामुळे शेतकरी वर्गाची धांदल उडाली व कापूस वेचणीसाठी गेलेले मजूर वर्ग घरी परतले. कापूस पिकाचे नुकसान झाले.

तसेच मठाचे, हरभरा, तूर, कापूस पिक लाल पडून वाया जाण्याची भिती शेतकरी कडून सांगण्यात आले. मठाचे पिक हे ऐन घरात येण्याच्या तोंडावर वाया गेल्याचे येथील गोरख माळी व रवींद्र वाघारे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले. तसेच गुरांचा चाराही बेमोसमी पावसात सापडल्याने शेतकरी वर्गाची फजिती झाली.

अक्कलकुवा
अक्कलकुवा व परीसरात सकाळपासून पावसाला सूरूवात झाली व दूपारी चार पासून पावसाचा जोर वाढला अवकाळी व तोही जास्त प्रमाणात पडणारा पाऊस शेतकरी वर्गाची चिंता वाढवीणारा असून या मूळे मोठे नूकसान होईल असे शेतकरी बोलू लागले.

अक्कलकुवा व परीसरात सकाळपासून पावसाला सूरूवात झाली व दूपारी चार पासून पावसाचा जोर वाढला अवकाळी व तोही जास्त प्रमाणात पडणारा पाऊस शेतकरी वर्गाची चिंता वाढवीणारा असून या मूळे मोठे नूकसान होईल असे शेतकरी बोलू लागले आहे तसेच कळंबू परिसरात दुपारी चार वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. यावेळी ठिक ठिकाणी शकोट्या हि पेटलेल्या होत्या.

तळोदा शहरात सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे यामुळे व रात्री पर्यंत देखील पाऊस सुरू होता.

वैजाली
शहादा तालुक्यातील वैजाली परिसरातील सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू होती. ढगाळ वातावरण असल्यामुळे जनजीवन पुर्णता विस्कळीत झाले होते.

दुपारी 12 नंतर पावसा जोर वाढला त्यामुळे शेतकरी व मजूर वर्गाची एकच धावपळ झाली. परिसरात सध्या कापूस वेचणी व ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून या कामासाठी गेलेल्या मजूरांना घरी परतावे लागले.

बेमोसमी पावसामुळे बोंड फेटलेल्या कापसाचे नुकसान झाले असून शेतातील एकरी तीन ते चार क्विंटल तयार कापसाचे नुकसान झाले आहे.

या पावसामुळे शेतकर्‍यांचा मोठा आर्थिक नुकसान झाले असून शेतात तोडणी झालेल्या ऊस रस्ता कोरडा होईपर्यंत पडून राहणार असल्याने वजनात मोठी घट होणार आहे.

बोरद
तळोदा तालुक्यातील बोरद येथे सकाळपासून रिमझीम पाऊस पडत् होता. दुपारी 4 वाजेपासून पावसाचा जोर वाढल्याने होता. शेतकर्‍यांना मोठया समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

बोरद परिसरात सकाळपासून ढगाळ वातवरण होते. सकाळी पावसाला रिपझीम सुरूवात झाली. सायंकाळी चार वाजेपासून पावसाचा जोर वाढल्याने कापूस वेचणीसाठी गेलेले मजूर परत आले. त्यामुळे शेतातील मालासह गुरांसाठी चारा, गहू, हरभरा या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

नवापूर
नवापूर शहर व परिसरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे निवडणूकीच्या प्रचारावर परिणाम झाला. तसेच काही पिकांचेही नुकसान झाले. पावसामुळे गारठयात मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच साथीचे रोग पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संपुर्ण तालुक्यात पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

LEAVE A REPLY

*