सरसंघचालक आज बारीपाड्यात

0

पिंपळनेर । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उद्या दि.5 रोजी सकाळी 10 वाजता साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे भेट देत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजता भागवत यांचे बारीपाडा येथे आगमन होईल. म्हसदी येथून सामोडा, दहिवेल, पिंपळनेर, कुडाशी, वार्सा, मापलगाव मार्गे श्री.भागवत यांचे सकाळी 10 वाजता बारीपाड्यात आगमन होईल.

बारीपाड्यातील ग्रामस्थांनी वाढविलेल्या जंगलाची पाहणी भागवत करतील. मधुमक्षीका पालन आणि विविध उपक्रमांची ते यावेळी माहिती घेतील. तसेच स्थानिक नागरिकांची संवाद साधतील.

स्थानिक सरपंच व विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी ते यावेळी चर्चा करणार आहेत. श्री.भागवत यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर बारीपाड्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज्यराखीव दलाची तुकडी दाखल झाली असून निजामपूर, शिंदखेडा, शिरपूर, धुळे या ठिकाणाहूनही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

आदिवासी परंपरेनुसार श्री.भागवत यांचे स्वागत करण्यात येणार असून दुर्गम भागात सरसंघ चालकांची ही पहिलीच भेट आहे.

सकाळी 10 ते 4 असा सहा तासांचा मुक्काम सरसंघचालकांचा बारिपाड्यात राहणार आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती राहणार आहे.

धुळ्यात आगमन
सरसंघचालक मोहन भागवत यांचे आज दि.4 रोजी धुळ्यात सायंकाळी 4.30 वाजता आगमन झाले. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तत्पुर्वी दोन बैठकांमध्ये पदाधिकार्‍यांना संबोधित केले. त्यानंतर प्रशांत मोराणकर यांच्या निवासस्थानी श्री.भागवत यांचा रात्री मुक्काम होता. उद्या सकाळी 7 वाजेच्या सुमारास ते बारीपाड्याकडे रवाना होणार आहेत. तेथून कार्यक्रम आटोपल्यानंतर ते नाशिककडे जातील.

LEAVE A REPLY

*