नंदुरबारात तुरळक पावसाची हजेरी

0

नंदुरबार । नंदुरबार येथे ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाने हजेरी लावल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीसह मिरची पथारीवर धावपळ उडाली. गेल्या आठवडयापासून जिल्ह्याच्या तापमानात चढ उतार पहायला मिळत आहे.

आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे नंदुरबार शहरात काही भागात तुरळक पाऊस पडल्याने धावपळ उडाली.

आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती विविध धान्यमाल झाकण्यात आला.

मिरची पथारीवर मिरची झाकण्यासाठी मजूरांची धावपळ झाली. अशा वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका बसणार असून शहरासह परिसरात थंडीचे प्रमाण वाढणार आहे.

LEAVE A REPLY

*