मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी धडपड उमेदवारांसह नेत्यांची होतेय दमछाक

0

महेश पाटील, नंदुरबार । नगरपालिका निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांची सर्व बाबींशी लढतांना दमछाक होतांना दिसून येत आहे. असे असले तरी प्रचारासाठी अवघे सात दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व प्रभागामध्ये पोहचण्यासाठी नेत्यांना धडपड करावी लागत आहे.

नंदुरबार नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी विविध पक्ष सज्ज झाले आहेत. प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नंदुरबार पालिकेसाठी 19 प्रभागातील 39 नगरसेवकांच्या जागांसाठी दि.13 डिसेंबर रोजी निवडणुक होत आहे. अर्ज माघारी व चिन्ह वाटपानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचाराचा जोर वाढला असून उमेदवारांनी आपआपल्या प्रभागात पक्ष कार्यालय उघडले आहेत. या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आपल्या प्रमुुख नेत्यांना पाचारण करण्यात येत आहे.

उमेदवारांनी आपआपल्या मतदार संघात जवळपास मतदारांना भेटण्याचे तीन ते चार फेर्‍या पूर्ण केल्या आहेत. आपल्या प्रभागात रॅलीसाठी व कॉर्नर सभेसाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्याची धडपड सुरू आहे.

नेत्यांनाही उमेदवार नाराज होवू नये व त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ द्यावा लागत आहे. पक्षाच्या उमेदवारांची मागणी वाढल्याने नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

यावर्षी नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी जनतेतून थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे. 2012 च्या तुलनेत यावर्षी नगराध्यक्ष पदासाठी मातब्बर उमेदवार असल्याने निवडणुकीत प्रचाराची रंगत अधिक वाढल्याचे दिसत आहे.

त्यासोबत उमेदवारांची मतदार संघाचे आमंत्रण स्विकारून आपल्या व्यस्त कार्यक्रमातून दिवसातून चार ते पाच प्रभागात हजेरी लावतांना दिसत आहेत. पालिका निवडणुकीसाठी शहरात प्रमुख लढत काँग्रेस व भाजपात दिसून येत आहे.

या निवडणुकीत जाहीर नेत्यांच्या सभेला अजून वेळ असला तरी प्रमुख नेत्यांनाच प्रचाराची खिंड लढवावी लागत आहे. काँग्रेसतर्फे शहरात आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर मदार असून भाजपातर्फे शहरातील प्रचारासाठी मोठी फौज उतरविण्यात आली आहे.

या भाजपा जिल्हाध्यक्ष खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.रविंद्र चौधरी, आ.शिरीष चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी ठिकठिकाणी आपआपल्या सभे घेतल्या आहेत तर काँग्रेस व शिवसेना युतीतर्फेही सभा होत आहेत.

पालिका निवडणुकीत प्रचारासाठी पक्षांतर्फे विविध प्रचाराचे फंडे वापरले जात आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांना समोरील पक्षातर्फे करण्यात येणार्‍या प्रचाराला आपल्या पक्षांकडून कमतरता राहू नये, यासाठीही नियोजन करावे लागत आहे.

विविध आघाडयांवर नेत्यांची कसरत
नगरपालिका निवडणुकीत उमेदवाराने स्वतःच्या प्रचारासोबत आपल्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी असलेला उमेदवाराचाही प्रचार करतांना दिसत आहे.

त्यामुळे त्याच्या प्रभाग मर्यादीत आहे. याउलट प्रमुख नेत्यांना संपूर्ण शहरातील मतदारांना सांभाळणे, उमेदवारांना नाराज असलेल्या इच्छुक उमेदवारांना, रसद पुरवून उभे केलेले उमेदवार अशा किती तरी आघाडीचे नियोजन प्रमुख नेत्यांना करावा लागत आहे.

ज्या पध्दतीने नेत्याच्या उत्साह असेल तसेच प्रकारे कार्यकर्तेही उत्साहात राहतील त्यामुळे उमेदवार व कार्यकर्ते यांचे मनोधैर्य उंचावण्याचे कामही नेत्यांना करावा लागत आहे.

अशा सर्व आघाडयांशी सामना करीत असतांना प्रमुख नेत्यांची दमछाक होतांना दिसत आहे. निवडणुकीला अवघे आठ दिवस हातात आहे.

त्यामुळे पालिका निवडणुकीत कुठलीही कमतरता राहु नये यासाठी सर्व अडचणींचा सामना करत स्वतःच्या तब्येत सांभाळत प्रचारासाठी कार्यकर्ते व उमेदवारांचा जोर भरण्याचे काम प्रमुख नेते करीत आहेत. प्रमुख नेत्यांना या सर्व आघाडी सांभाळत असतांना दमछाक होत आहे.

LEAVE A REPLY

*