‘वासुदेव’ व ‘जादूगार’ करतोय तळोदेकरांची करमणूक

0

मोदलपाडा – तळोदा शहरात सध्या नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक पक्ष व प्रत्येक उमेदवार मतदारांना प्रभावित करण्यासाठी नामी शक्कल लढवितांना दिसून येत आहे.

प्रचारासाठी सध्या पहाटे विविध प्रभागांमध्ये वासुदेवांची स्वारी फिरतांना दिसून येत आहे. विविध गीतांच्या माध्यमातून गुलाबी थंडीत वासुदेव आपल्या उमेदवारांना मते द्या यासाठी मतदारांना साकडे घालतांना दिसून येत आहे.

त्या निमित्ताने लोप पावत चाललेली वासुदेव हा लोककलेचा प्रकार निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने का होईना, शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे.

याशिवाय तळोदा पालिकेतील काही उमेदवारांनी आपला प्रचार करण्यासाठी जादुगारांना शहरात पाचारण केले आहे. जादूचे विविध प्रयोग दाखवून जादूगार मतदारांना मते देण्याचे आवाहन करीत आहेत.

निवडणुकीच्या प्रचारासाठी वासुदेव व जादूगार यांच्या निमित्ताने सध्या शहरवासीयांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. या मनोरंजनातून उमेदवारांचा प्रचारही साध्य होत आहे.

LEAVE A REPLY

*