श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

0

मामाचे मोहिदे ता.शहादा । श्रीदत्त प्रभूंच्या जयंतीनिमित्ताने भरणार्‍या यात्रेच्या दुसर्‍या दिवशीसुद्धा हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. यात्रेच्या दोन दिवसात दोनशेच्यावर तुला उतरवण्यात आल्या.

श्रीदत्तप्रभूंचे हे जागृत देवस्थान असल्याने वेगवेगळे नवस मानले जातात. व नवस पूर्ण झाल्यावर तो दत्त पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होते.

तुला उतरवण्यासाठी स्वतंत्र तुला मंडपाची व्यवस्था केलेली आहे. तुला उतरवतांना नवसाचा व्यक्ती एका पारड्यात तर दुसर्‍या पारड्यात मानल्याप्रमाणे नारळ, केळी, साखर, गुळ, सुट्टे पैशांची चिल्लर, खडीसाखर असे पदार्थ ठेवून सम वजनाची तुला उतरवत असतात.

नवस मानल्यावर पांढर्‍या कोर्‍या कापडात नारळ बांधून मंदिराच्या गाभार्‍यात भिंजीजवळील काठीला ते बांधतात. गेल्या 300 वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे.

पहिल्याच दिवशी लांब अशा रांगेत उभे राहून भाविकांनी दर्शन घेतले. रविवार सुट्टीचा दिवस तसेच परिसर यात्रेनिमित्त सोमवारची सुट्टी अशा लगत सुट्ट्यामुळे भाविकांनी हजारोंच्या संख्येने यात्रेत दाखल झाले.

रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ सुरू होती. शिवाय परिसरातील, गावातील भजनी मंडळींनी आपापली भजनी मंडळी आणून भजन म्हटले.

LEAVE A REPLY

*