सारंगखेडा येथे आज अश्व महोत्सवाचे उद्घाटन

0

सारंगखेडा । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि चेतक फेस्टिव्हल समिती, सारंगखेडा आयोजित अश्व महोत्सव 2017 चे उदघाटन उद्या दि.3 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पर्यटन ऊर्जा, साप्रवि राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. हीना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रजनी नाईक, आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. अमरिशभाई पटेल, आ.डॉ. सुधीर तांबे, आ.डॉ. अपूर्व हिरे, आ.सुरुपसिंग नाईक, आ.डॉ. विजयकुमार गावित, आ. के. सी.पाडवी, आ.उदेसिंग पाडवी, दोंडाईचाच्या नगराध्यक्षा नयनकुवर रावल, चेतक फेस्टिव्हल सारंगखेडाचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, सारंगखेड्याच्या सरपंच भारती कोळी उपस्थित राहणार आहेत.

सांरगखेडा येथील अश्व बाजाराला 300 वर्षांचा इतिहास आहे. हा भारताचा सर्वात मोठा अश्व महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये भारतीय वंशाचे अश्व प्रदर्शन, अश्व दौड आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

नागरिक, पर्यटकांनी या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, नंदुरबारचे प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*