30 हजाराची लाच घेतांना पिता-पुत्र गजाआड

0

शहादा । शहादा येथे भुमिअभिलेख कार्यालयाच्या परिरक्षण भुमापकासह त्याच्या मुलाला 30 हजार रूपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव ता.शहादा येथील गावठाण जागेची मोजमाप करण्यासाठी शहादा येथील भुमिअभिलेख कार्यालयाच्या परीरक्षण भुमापक सुभाष धुळू साबळे यांनी गावठाण जागेचे मोजमाप करण्यासाठी गावातील 100 घरांच्या लोकांकडून प्रत्येकी 500 रूपयांप्रमाणे लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती प्रत्येकी 300 रूपये याप्रमाणे दि.21 नोव्हेंबर रोजी मागणी केली होती. तक्रारदाराकडून आज दि. 2 डिसेंबर रोजी 30 हजार रूपयाची लाच स्विकारतांना सुभाष धुळू साबळे व त्याचा मुलगा सुदर्शनसिंग सुभाष साबळे उर्फ विक्की यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

साबळे याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आडगाव गावातील गावठाण जागेचे मोजमाप करण्यासाठी लाच स्विकारली.

याप्रकरणी त्यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 कलम 7,8, 12,13 (1) (ड) सह 13 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापुर्वी सुभाष धुळू साबळे याच्याविरूध्द यापुर्वीही लाचलुचपत विभाग धुळे यांनी 12 फेबु्रवारी 2015 रोजी लाच स्विकारण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली एस.टी. जााव, पोलीस उपअधिक्षक अ‍ॅन्टी करेप्शन ब्युरो पोनि करूणाशील तायडे, मपोनि संगिता पाटील, पो.कॉ. उत्तम महाजन, संजय गुमाने, पोना दिपक चित्ते, जितेंद्र तांबोळी, मनोहर बोरसे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

*