निवडणूक कर्मचार्‍यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

0

नंदुरबार। नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण शिबीर छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात पार पडले.

नंदुरबार पालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटमंदिरात पहिल्या टप्प्यात कमर्र्चार्‍यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

पालिकेसाठी दि.13 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुक विभागाने मतदानासाठी शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयांमधील 710 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

याशिवाय राखीव कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे. नंदुरबार शहरात लाखावर मतदार असून मतदानासाठी 126 मतदान केंद्रे आहेत.

मतदानासाठी एकूण 142 पथके राहणार आहेत. एका पथकात 5 जण असतील. त्यात एक केंद्राध्याक्ष,तीन मतदान अधिकारी,एक शिपाई यांचा समावेश असेल.

मतदान केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आज घेण्यात आले. त्यात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

मतदानासाठी ईव्हीएम मशिन संदर्भात माहिती दिली. त्यासोबत टपालाद्वारे येणार्‍या मतांची मोजणीसंदर्भात माहिती देण्यात आली. कर्मचारी मतदानाचे काम करीत असतांना गंभीरतने काम कारावे अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी गणेश गिरी उपस्थित होते. कर्मचार्‍यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर दि.9 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

निवडणुक आयोगाने 12 क्षेत्रीय पथके देखील नियुक्त केली आहे. या अधिकार्‍यांतर्फे आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदान केंद्राची पाहणी करण्यात येणार असून याच 12 क्षेत्रीय पथकांना 12 मार्ग निश्चित करून दिले. त्यानुसार ते कार्यवाही करणार आहेत.

शेवटच्या काही दिवसात क्षेत्रीय दंडाधिकार्‍यांचे अधिकार दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना जागेवरच कारवाई करण्यास मदत होणार असून निवडणुकीच्या सर्वप्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून धुळे जिल्हा परिषदचे अतिरीक्त मुख्यकार्यकारी अर्जुन गुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशिक्षण शिबीरात 710 पैकी 665 कर्मचारी उपस्थित होते तर 45 कर्मचारी अनुपस्थित होते.

LEAVE A REPLY

*