प्रकाश खैरनार,नवापूर । येथील पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तसेच अपेक्षांनादेखील निवडणूक आयोगाने चिन्ह दिले असून जवळपास सर्वच प्रभागात आता उमेदवारांची संख्या व प्रचार चिन्हाचा वापर सुरू झाला आहे.

नवापूर पालिका निवडणुकीत आता 10 प्रभागातून 20 उमेदवारांची व 1 नगराध्यक्ष पदासाठी मतदान करण्याची वेळ आली आहे.

28 हजार 817 मतदारांना आता आपला उमेदवार निवडून आणायचा असून आता 6 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी तर 95 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांने आपले उमेदवार उभे केले आहे तर अपक्षांची संख्यादेखील वाढली आहे.

 

काल चिन्ह वाटप झाल्यामुळे सायंकाळपासुनच कार्यालय व मंडप उभारण्याची सुरूवात केली. नेत्यांच्या उपस्थितीत काल कार्यालयाचा नारळ फोडण्याचे काम आटोपण्यात आले असून लगोलग प्रचाराला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे रिक्षाचाही वापर केला जातो आहे. सायकल मोटरसायकलवर व चारचाकी वाहनावर पक्षाचे अधिकृत झेंडे फडकत असून जवळपास शहरांत सर्वत्र निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे.

नेतेमंडळी देखील आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत. प्रचार फेर्‍या रंगत आहेत. प्रचार फेरीमध्येसुद्धा नेते आपली उपस्थिती लावत आहेत.

विशेष म्हणजे जवळच्या व्यक्तीची गळाभेट घेतली जात आहे तर दुसरीकडे वयोवृद्ध मतदारांचा चरणस्पर्श केला जात आहे. सध्या तरी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून आतापर्यंत बर्‍याच मतदारांची भेट झाली होती.

मतदार देखील नवीन उमेदवाराला आपल्या समस्यांचा पाढा मांडत आहेत. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मत मागायला येणार्‍या उमेदवाराला खडे बोल सुनावले जात आहेत.

जे उमेदवारी करुनही अद्याप भेटीला आले नाही त्यांची खडे बोल सुनावणयासाठी प्रतिक्षा केली जात आहे. एकंदरीत निवडणूकिचे वातावरण सर्वत्र तयार झाले असून कार्यालय व मंडपाने शहर सुसज्ज झाले आहे, प्रतिक्षा फक्त मतदानाची आहे.

LEAVE A REPLY

*