कळंबू येथे अंगणवाड्यांना फिल्टर वाटप

0

मामाचे मोहिदे/ कळंबू । कळबु येथील ग्रा.पं. कार्यालयात पंचायत समिती सदस्य हिमतराव बोरसे यांच्या हस्ते फिल्टर वाटप करण्यात आले.येथील कळबु, कुकावल व कोठलीतील अंगणवाड्याना दोन लिटर क्षमतेचे वॉटर फिल्टर पं.स.सदस्य हिमंतराव बोरसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी कळंबू ग्रा.पं.च्या लोकनियुक्त सरपंच सौ.सुवर्णाबाई बोरसे, उपसरपंच वासुदेव बोरसे, ग्रामविकास अधिकारी बी.बी.देसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कळंबू अंगणवाडीस तीन व कुकावल, कोठली प्रत्येकी दोन असे एकुण सात फिल्टर वाटप करण्यात आले.

गावातील सार्वजनिक वाचनालयास ही एक वॉटर फिल्टर भेट देण्यात आले. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका श्रीमती मालती बोरसे, सुनंदा पवार, प्रमिला माळी, निर्मला सोनवणे, कल्पना देसले,कविता माळी,मुक्ता गिरासे, तसेच ग्रा.पं.सदस्य वेडू भिल, सुरेश कुवंर, ललित बोरसे, सायंकाबाई कुवर ,किरणबाई बोरसे, देवकाबाई देवरे, भारती पवार, काकुबाई कुवर, ग्रा पं.कर्मचारी देविदास कुवर, सागर भावसार, मनोहर बोरसे, निंबा कुवर आदीसंह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*