आरोग्य शिबिरात 140 पोलिसांची तपासणी

0

शहादा ।येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर झाले. या शिबीरात 140 अधिकारी व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळ शहादा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा व तुलसी वैद्यकीय सेवाभावी संस्था संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबीर झाले.

पोलीस उपअधिक्षक एम.बी. पाटील यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी प्रभारी निरीक्षक सुभाष जाधव, ज्ञानेश्वर बडगुजर, म्हसावदचे पोलीस निरीक्षक भामरे (धडगांव), बी.डी.शिंदे (शहादा), सैंदाणे (सारंगखेडा) आदी उपस्थित होते.

शिबीरात रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आदी आजारांची तपासणी करण्यात आली.डॉ.प्रफुल्ल पाटील, डॉ.साईनाथ पाटील, डॉ. राकेश पाटील व तुलसी रूग्णालयाच्या टीमने 140 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी केली. आरोग्य तपासणीनंतर विविध आजारांवर उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबीरासाठी गिरीश पाटील, रूपेश पाटील, जितु पाटील, हर्षद पाटील (लोणखेडा), सचिन पाटील (पाडळदा), दिपक पाटील (सारंगखेडा) यांच्यासह शहादा,सारंगखेडा, म्हसावद,धडगांव,प्रकाशा,तोरखेडा, बोरद येथील पोलीस स्टेशन व दुरक्षेत्रातील कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*