उमेदवार होतोय मतदारांसमोर नतमस्तक !

0

प्रकाश खैरनार,नवापूर । नवापूर नगरपालिका निवडणुकीला आता बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले असून उमेदवार मतदार राजाला घरोघरी जावून मतांची विनंती करतांना दिसत आहे.

मतदार राजादेखील पाच वर्षांनी येणारे व भावी नगरसेवकांचे तेवढयाच जोमात स्वागत करत आहे. घाबरू नका, चिंता करू नका आम्ही आहोत, कोणी पॅनलला मत मागत आहे तर कोणी एक मला द्या बाकी कुणाला भी द्या, अशी भुमिका घेत आहेत.

नवापूर पालिकेसाठी दि.13 डिसेंबरला मतदान होत असून 10 प्रभागातून 20 नगरसेवक, एक नगराध्यक्ष अशी तीन मते शहरातील एकूण 28 हजार 711 मतदारांना द्यायची आहेत. निवडणुकीत उभा उमेदवार घरोघरी प्रचार करत आहे.

कार्यकर्ते निवडणुक याद्यांची छाननी करत आहेत. विशेष काहींची नावे वेगवेगळया प्रभागात जास्त प्रमाणात दिसत आहे. प्रथम याद्यामध्ये जातीचे नाव तर तीनमध्ये पत्नीचे नाव असा देखील घोळ आहे.

ज्या मतदारांची नावे अशी विखुरलेली आहेत. त्यांना जाये तो जाये का अशी परिस्थिती झाली आहे. विशेष म्हणजे बाहेर गावी नोकरी निमित्त व सासरी गेलेल्या मुलींची यादी वेगळी होत आहे.

त्यांचा मोबाईल नंबर मिळवून संपर्क साधला जात आहे. त्यांना मतदानासाठी बोलावले जात असून प्रवास खर्चासह लक्ष्मीदर्शन दाखविण्याचेही आमिष दाखवले जात आहेत.

एकंदरीत निवडणुकीला चांगला रंग चढला आहे. काँग्रेसचे उमेदवार इतर पक्षांच्या टिकीटावर लढत आहेत. पक्ष उमेदवारदेखील आपला प्रचार जोरात करत आहेत. प्रत्येक प्रभागातील इच्छूक आपल्या समर्थकासह कार्यकर्त्यांसह घोषणा देत हात जोडत घरोघरी जात आहेत.

LEAVE A REPLY

*