नंदुरबार शहरात पोलीस दलातर्फेदंगा नियंत्रण प्रात्यक्षिक

0

नंदुरबार । दि.1 । नंदुरबार शहरात पोलीस दलातर्फे निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर दंगा काबु पथकाचे प्रत्याक्षिक करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातील प्रमुख चौकात दंगा काबूचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

नंदुरबार येथे नगरपालिकेची निवडणुक दि.13 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, घडल्यास पोलीस दलातर्फे तातडीने उपाययोजना कशी करता येईल, दक्षतेने पोलीस दलाने आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास अमर चित्र मंदिर परिसरात दंग्याचे नियंत्रण प्रात्यक्षिक घेण्यात आले.

या प्रात्यक्षिकात दंगे करूंवर काबू करण्यासाठी काय करता येईल, सौम्य लाठीमार आदी प्रात्यक्षिक करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला तहसिलदार नितीन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, विभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, विजय सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, के.जी. पवार यांच्यासह 21 अधिकारी उपस्थित होते तर 155 पोलीस कर्मचारी या प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते. यात नंदुरबार शहरातील अग्निशमन दलाची गाडीलाही पाचारण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*