प्रा.भीमसिंग वळवी यांना छत्तीसगडचा महात्मा फुले समता पुरस्कार

0

नंदुरबार । दि.1 ।नेहमीच सामाजिक दायित्व निभावणारे, आदिवासींच्या मूलभूत हक्क व एक मोठी वैचारिक चळवळ उभारणारे येथील प्रा.भीमसिंग वळवी यांच्या सामाजिक कार्याची भारतीय दलित साहित्य अकादमी, रायपूर (छत्तीसगड) यांनी दखल घेत त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा व जीवन मूल्ये आजही शाबूत असूनही वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या आदिवासींना दिशा दाखविणारे, आदिवासींच्या हक्काबाबत संविधानिक व सांस्कृतिक तसेच वैचारिकदृष्टया जागृत करणारे व विविध संघटनांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून व वैयक्तिक पातळीवर समाजासाठी निस्पृह अन निस्वार्थ भावनेने काम करणार्‍या समाज धुरिणांना सेवेसाठी बळ मिळावे, यासाठी प्रा.वळवी यांनी समाज कार्यकर्ता ऋणनिर्देश संमेलन 2011 मध्ये सुरु केले. पहिल्या वर्षी संघटनांमधून अविरतपणे समाजाची सेवा करणार्‍या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

दुसर्‍यावर्षी आदिवासींमधील ज्येष्ठ चळवळकर्त्यांचा सन्मान केला. विविध आंदोलनातून आदिवासींवरील अन्यायाला वाचा फोडणार्‍या आंदोलनकर्त्यांचा पाचव्या वर्षी सत्कार झाला.

अशा विविधांगी वैचारिक चळवळ, संमेलने व शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी समाज, साहित्य, शिक्षण व युवा यासाठी संवेदनशीलतेने आणि निस्वार्थपणे आजही कार्य सुरु आहे.

या कार्याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने समाज गौरव पुरस्कार देऊन प्रा. वळवी यांना सन्मानित करण्यात आलेे. शिवाय महात्मा फुले समता अवॉर्ड देऊनही त्यांना गौरविण्यात आले.

त्यापाठोपाठ यंदाही भारतीय दलित साहित्य अकादमी रायपूर (छत्तीसगड) यांच्यामार्फत प्रा. वळवी यांना महात्मा फुले समता अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

याबाबत प्रा. भिमसिंग वळवी यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून विविध संघटनांनी त्यांचा सत्कार केलीा आहे.

LEAVE A REPLY

*