अल्पवयीन युवतीचा विनयभंगप्रकरणी एकास अटक

0

नंदुरबार । दि.1 । धडगांव तालुक्यातील गळचा भाकणपाडा येथे हातपंपावर पाणी भरत असलेल्या युतीच्या विनयभंग केल्याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गळचाभाकणपाडा (ता.धडगांव) येथील युवती ग्रामपंचायतीच्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली असता, विका बोठडा पावरा, भुरसा चमार पावरा, फत्तेसिंग पावरा, बोठडया चमारा पावरा सर्व माळचाभाकणपाडा ता.धडगांव यांनी युवतीचा विनयभंग केला.

युवतीच्या मदतीला आलेल्या भिमसिंग चिमा पावरा यास मारहाण करण्यात आली. नातेवाईकांवर दगड फेकून वाईव शिवीगाळ करून शिवीगाळ केली.

म्हणून धडगांव पोलीस ठाण्यात या चौघांविरूध्द भादंवि कलम 354, 337, 323, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून विका बोथर्‍या पावरा यास अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास ज्योतीबा दिपक करीत आहेत.

LEAVE A REPLY

*