नंदुरबारात नगराध्यक्षपदाच्या पाच तर नगरसेवकाच्या रिंगणातून 18 उमेदवारांची माघार

0

नंदुरबार । दि.30 । प्रतिनिधी-नंदुरबार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठीच्या पाच तर नगरसेवक पदाच्या 18 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवकपदासाठी 114 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नंदुरबार शहराच्या नगरपालिकेसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी वंदना रविंद्र चौधरी, सुनंदा इंद्रसिंग ठाकूर, दिलावरशा कादरशा फकिर, राकेश पंडीत मराठे, अमरीन अब्दुल गफ्फार या पाच उमेदवारांनी माघार घेतली.

त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता काँग्रेसतर्फे सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी, भाजपातर्फे डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी, राष्ट्रवादीचे आरिफ कमर शेख, एमआयएमतर्फे सैय्यद रफहत हुसेन, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पुष्पाबाई प्रविण थोरात व अपक्ष प्रकाश बारकू भोई हे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. 1 ब मधून दिपमाला राजेश मेटकर, प्रभाग क्र. 4 ब. दिलीप हिरालाल चौधरी, प्रभाग क्र. 6 ब. मधून कोमल निखील तांबोळी, प्रभाग क्र. 9 अ मधून स्वाती राहुल आघाव, प्रभाग क्र. 11 अ मधून रजिया निसार पिंजारी, प्रभाग क्र. 11 ब मधून मोहसीन निसार पिंजारी, प्रभाग क्र. 12 ब मधून रशिदाबी कादर शेख, प्रभाग क्र. 13 ब मधून अनिसोद्दीन समशोरोद्दीन शेख, प्रभाग क्र. 15 अ. मधून मो.इकबाल शेख सुलेमान कुरेशी, प्रभाग क्र. 16 अ म्हणून आकाश प्रविण चौधरी, मोहन छोटालाल श्रॉफ, प्रभाग क्र. 17 अ मधून कलावती वरत्या पाडवी, प्रभाग क्र. 17 ब मधून प्रकाश भिकन चौधरी, वंदना रविंद्र चौधरी, स्वाती नामदेव चौधरी, फिरोजाबी राजू शाह फकिर, प्रभाग क्र. 18 ब मधून बाबुलाल मंगा चौधरी, अब्दुल मन्नान अब्दुल गनी सिकलीकर या 23 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली.

त्यामुळे आता नंदुरबार नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचे सहा तर नगरसेवकपदाचे 114 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काही उमेदवारांनी हरकत घेतल्यामुळे न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

LEAVE A REPLY

*