नवापुरात नऊ उमेदवारांची माघार : 95 रिंगणात

0

नवापूर । दि.30 । प्रतिनिधी-येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम दिवशी 9 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.

त्यामुळे आता निवडणूक रिंगणात नगराध्यक्षपदासाठीचे 6 तर नगरसेवकपदासाठीचे 95 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आज माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये वार्ड.10(ब) भरत विक्रम वाघ, वार्ड.6 (ब) अल्पेश गोरख बच्छाव, वार्ड.8(ब) शांताराम सुरेश चौधरी, वार्ड.7 (अ) राकेश पुरुषोत्तम सोनार, वार्ड 10 (ब) रफीकखॉ अहमदखाँ पठाण, वार्ड.6(ब) कमलेश जयंतीलाल छत्रीवाला, वार्ड.6 (ब) जनक मनहरलाल दलाल, वार्ड 1(अ) मुकेश रामजी गावीत, वार्ड क्र 2(ब) संदिप भगवान मराठे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता नगरसेवकपदासाठी 95 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नगराध्यक्षपदासाठी भाजपातर्फे ज्योती दीपचंद जायस्वाल, काँग्रेसतर्फे हेमलता अजय पाटील, समाजवादी पार्टीतर्फे शेख अमिना जावेद, विकास आघाडीतर्फे सोनल धर्मेंद्र पाटील, बहुजन समाज पार्टीतर्फे संगीता गजानन सावरे, राष्ट्रवादीतर्फे डॉ.अर्चना गोरजी वळवी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसिलदार प्रमोद वसावे, नायब तहसिलदार राजेंद्र नजन, न.पा कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, किसन वाडेकर,वामन अहिरे,प्रकल्प अधिकारी प्रशांत भट,अंनत पाटील,राजु गावीत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*