नंदुरबारात महिनाभर तायक्वांदो प्रशिक्षण शिबिर

0

नंदुरबार । दि.29 । प्रतिनिधी-तायक्वांदो खेळ हा स्व संरक्षणासाठी फायदेशीर ठरणार आहे. ऑलम्पिक स्तरावरील खेळ शिकायला मिळत आहे, यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी केले. ते येथील तायक्वांदो प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.

तायक्वांदो जिल्हा असोसिएशन नंदुरबार व आदिवासी मुलांचे वसतिगृह पटेलवाडी, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दि.28 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर 2017 दरम्यान आदिवासी मुलांचे वसतिगृह पटेलवाडी, नंदुरबार येथे तायक्वांदो प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी के.आर.वळवी उपस्थित होते. तसेच वसतिगृहाचे गृहपाल के.एस.मोरे, जी.एच.मोहुर्ले, संजय भडके तसेच कर्मचारी वृंदांसह विद्यार्थी उपस्थित होते.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी तायक्वांदोच्या खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. या खेळाडूंना जिल्हा प्रशिक्षक जावेद ए. बागवान यांचे प्रशिक्षण लाभत आहे.

यावेळी श्रीमती निमा अरोरा यांनी विद्यार्थ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केले. सदर उपक्रमाचे कौतुक करुन या चांगल्या उपक्रमात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप पाटील यांनी तर प्रस्ताविक व्ही.एस.बच्छे यांनी केले. शेवटी आभार रुपेश व्ही. तिजारे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*