ऊस वाहतुकीला सीमाशुल्क माफ करण्यासाठी रास्तारोको आंदोलन

0

मोदलपाडा ता.तळोदा । अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या ऊस वाहतुकीला खापर, गुलीउंबर आर.टी.ओ. सीमा शुल्क नाक्यावर सुट मिळावी यासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा वाजता आर.टी.ओ. चेक पोस्टवर रास्ता रोको आंदोलन केले.

अक्कलकुवा, तळोदा तालुक्यासह गुजरात राज्यातील शेतकर्‍यांचा ऊस गुजरात राज्यात सागबारा येथील दीपक शुगर खांडसरी ऊस वाहतूक करताना गुलीउंबर आर.टी.ओ. चेक पोस्टवर उसतोड ट्रॅक्टर व ट्रक वाहतुकीला सीमा शुल्कसह अतिरिक्त वजनास दंडात्मक कारवाई केली जाते.

त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून शेतकर्‍यांची ऊस वाहतूक थांबली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत होते. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देऊन वाहतुकीला सुट मिळावी अन्यथा रास्तारोको करण्यात येईल, अस इशारा देण्यात आला होता.

त्यानुसार आज सकाळी 11 वाजता गुलीउंबर आर.टी. ओ. चेकपोस्टवर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सदस्य नागेश पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, खापर येथील उपसरपंच विनोद कामे, यशवंत नाईक, मनोज ढागा, निलेश जैन, जयमल पाडवी, घनश्याम पाडवी यांच्यासह शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी आंदोलन शेतकर्‍यांशी संतोषसिंघ जनरल मॅनेजर, प्रमोद दवे मोटर वाहन निरीक्षक, परीक्षित पाटील यांनी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

यावेळी मनोज डागा, मनोज सोनार, कपिल चौधरी, भूषण कामे, भूषण पाडवी, संतोष सूर्यवंशी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

*