नंदुरबार जिल्ह्यात एच.आय.व्ही.रुग्णांच्या संख्येत वाढ

0

नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातील एच.आय.व्ही. रूग्णांची संख्या चार वर्षात 1 हजार 48 वाढली आहे. यातील 3 हजार 500 रूग्ण नियमीत उपचार घेत आहेत.

नंदुबार जिल्ह्यातील एच.आय.व्ही. संसर्ग झालेल्या रूणांची संख्या ही 4 हजार 318 आहे. जिल्ह्यात 2009 पासून एड्सच्या रूग्णांची संख्या मोजण्यास सुरूवात झाली आहे.

या मागील चार वर्षात बघितले तर 2014 मध्ये 3270 रूग्ण, 2015 मध्ये 3608 रूग्ण, 2016 मध्ये 3981, 2017 मध्ये 4318 इतकी संख्या आढळून आली.

2014 च्या तुलनेत बघितले तर चार वर्षात जिल्ह्यातील एच.आय.व्ही. बाधितांची संख्या ही 1 हजार 48 वाढली आहे. नंदुरबार जिल्ह्यात 14 प्राथमिक आरोग्य केंद्रात 28 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात, 97 खाजगी केंद्रात एच.आय.व्ही. तपासणीची सोय आहे.

जिल्ह्यातील 4 हजार 318 रूग्णांमधून 3 हजार 500 रूग्ण नियमीत उपचार घेत आहे. तर 216 रूग्णांनी उपचार घेणे बंद केले आहे.

एड्स रूग्णांसाठी कार्य करणारी संस्था
नंदुरबार जिल्यातील एच.आय.व्ही. बाधितांसाठी झटणारी नेटवर्क ऑफ बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही./ एड्स संस्था काम करत आहे. त्यांनी बाधितांना मदतीचा हात पुढे केला आहे.

या संस्थेने आतापर्यंत विहानद्वारे 665 रूग्णांना संजय गांधी निराधार योजनेचा, 320 रूग्णांना अंत्योदय,42 रूग्णांना महिला बालकल्याणमार्फत योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.

747 रूग्णांचे आधारकार्ड बनवून दिले असुन, तीन रूग्णांना घरकुल मिळवून दिले. तर 2270 बाधितांचे उपत्पन्नाचा दाखला मिळवून दिला.जिल्ह्यातील एच.आय.व्ही. बाधितांना मिळणार्‍या उत्पन्नाच्या दाखल्यातील निकष बदलण्यात यावा, या दृष्टीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्याच्यावर उपाययोजना होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती नेटर्वक ऑफ माय पिपल लिव्हींग संस्थेच्या प्रकल्प संचालिका आशा माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्रीमती माळी म्हणाल्या, नंदुरबार जिल्ह्यात 2006 पासून नेटवर्क ऑफ बायपिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही./ एड्स या संस्थेचा नंदुरबार येथे काम सुरू असून एच.व्ही.आय. संसर्गीत व्यक्ती करीता सामाजिक कल्याणकारी योजनेचा उत्पन्न निकषात बदल करण्याकरीता झटत आहे.

ही संस्था सन 2001 पासून एच.आय.व्ही. संसर्गीत व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. नंदुरबार जिल्ह्यात पुरूष 2284 तर महिला 1748, तृतीय पंथी 3, बालके 283 असे एकूण 4318 एच.आय.व्ही. संसर्गित आहेत.

त्यांना शासनाच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजनेचे जसे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आदींचा लाभ मिळण्याकरीता वार्षिक उत्पन्नाचा निकष सन 1980 पासून वार्षिक 21 हजार रूपये आहे.

2017 ला हाच निकष आहे.अद्याप पर्यंत या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल शासनाने न केल्यामुळे दुर्घर आजार असलेल्या गरीब गरजू व निराधार व्यक्तींना शासनामार्फ वार्षिक 21 हजार उत्पन्नाचा दाखला मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.

आज गरीबातील गरीब व्यक्तीसुध्दा दिवसाला 100 रूपये रोज कमवितो तर महिन्याला तीन हजार रूपये वर्षाला 36 हजार रूपये होतात.

त्यामुळे दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरत आहेत. शासनाने वार्षिक उत्पन्न 21 हजार रूपये उत्पन्नाचा निकषात बदल करावा अन्यथा वार्षिक उत्पन्न निकष मर्यादा वाढविण्यात यावी जेणे करून जास्तीत जास्त दुर्धर आजार असलेल्या गरीब गरजू व निराधार व्यक्ती शासनाच्या महत्वाच्या सामाजिल लोकोपयोगी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे सोयीस्कर होईल जेणेकरून एच.आय.व्ही. संसर्गीत व्यक्तीचे जीवनमान वाढविण्यास सहकार्य लाभले, असेही श्रीमती आशा माळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*