शेअर्सच्या नावाखाली महिलेची सात लाखात फसवणूक

0

नंदुरबार । दि.28 । प्रतिनिधी-बनावट शेअर्स कागदपत्र दाखवून महिलेची 6 लाख 71 हजार 200 रुपयांत फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 28 नोव्हेंबर रोजी प्रविण दादाराव शेकोकर, दीपा प्रविण शेकोकर (दोघे रा.सुवास्तू अपार्टमेंट सारसार्थक गेट क्र.54 एमआयडीसी औरंगाबाद), मुकेश उत्तमराव चौधरी (रा.प्लॉट क्र.111, हनुमान मंदिराजवळ जळगाव) व प्रमोद कचरु आदिक (रा.खानापूर) यांनी इन्टीग्रेटेड ऑटोमेशन अँड रोबेटीक्स ई 122 एमआयडीसी एरीया औरंगाबाद ही स्वतःच्या शेअर्सची कंपनी असल्याचे भासवून येथील कोरीटनाका हुडको कॉलनी परिसरातील महिला अर्चना पंकज पवार यांनां विश्वासात घेतले.

त्यांना कागदपत्रे दाखवली व त्यांच्याकडून या कंपनीत 8 लाख 20 हजाराची गुंतवणूक करुन घेतली व तीच्या खात्यावर 1 लाख 48 800 रुपये जमा केले.

त्यानंतर वरील चौघांनी अर्चना पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून 6 लाख 71 हजार 200 रुपयांचा अपहार केला. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*