सारंगखेडा यात्रेला रशियन छायाचित्रकाराची भेट

0

सारंगखेडा । दि.28 । वार्ताहर-येथील एकमुखी दत्तमंदीराच्या यात्रोत्सवानिमित्त जागतिक रशियन अश्वछायाचित्रकार कातिया ड्रुज या दहा दिवसासाठी सारंगखेडयात दाखल झाल्या आहेत.

घोडे-बाजारासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या येथील एकमुखी दत्तप्रभुंची यात्रा दि. 3 डिसेपासुन भरविण्यात येणार आहे. सारंगखेडा यात्रेचे स्वरुप बघता यावर्षी यात्रेत चेतक फेस्टीवल व पर्यटन विभागातर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

येथिल घोड़े बाजार जागतिक पातळीवर पोहचला आहे. त्यात भर म्हणून यावर्षी जागतिक दर्जाच्या रशियन छायाचित्रकार कातिया ड्रुज या 10 दिवसांसाठी सारंगखेडयात दाखल झाल्या आहेत.

कातिया ड्रुज या अश्व फोटोग्राफर म्हणून जगप्रसिद्ध आहेत. यात्रेचे आयोजक जयपालसिंह रावल यांनी त्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

*