तळोदा येथे पिठाच्या गिरणीला आग साडेचार लाखाचे नुकसान

0

मोदलपाडा ता. शहादा वार्ताहर । तळोदा शहरातील कॉलेज रोडवरील किराणा दुकान व पिठाच्या गिरणीला आग लागून सुमारे 4 लाख 58हजार 50 रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. घटनास्थळी आ. उदेसिंग पाडवी यांनी भेट देऊन पाहणी केली.

तळोदा शहरातील कॉलेज रोडवर चंद्रकांत दिगंबर मगरे यांची श्री स्वामी समर्थ पिठाची गिरणी असून गिरणी आहे. काल दि.27 रोजी रात्री अकराच्या सुमारास या गिरणीला अचानक आग लागली.

त्यात इलेक्ट्रिक मोटर व साहित्य जळून खाक झाले. त्यात एकूण 1 लाख 88 हजार 600 रुपयांचे साहित्य जळून नुकसान झाले आहे.

या गिरणीला लागूनच असलेल्या प्रकाश विठ्ठल साठे यांच्या रेणुका किराणा भांडारलाही या आगीचा फटका बसला. त्यात दुकानातील किराणा माल व फर्निचर जळून खाक झाले.

घटनास्थळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अनेश वळवी व तलाठी अरविंद पाटील यांनी पंचनामा केला. दोन्ही दुकानातील एकूण 4 लाख 58 हजार 50रुपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या सतर्कमुळे पुढील अनर्थ टळला.

घटनास्थळी आ.उदेसिंग पाडवी, अजय परदेशी, योगेश चौधरी, प्रदीप शेंडे डॉ.स्वप्नील बैसाणे, दीपक चौधरी, संजय कलाल किरण सूर्यवंशी भास्कर मराठे जगदीश परदेशी प्रसाद बैकर तर हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी आदींनी भेट दिली.

LEAVE A REPLY

*