शहादा येथील विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ

0

नंदुरबार । प्रतिनिधी-शहादा येथील विवाहितेचा दोन लाख रूपयांसाठी मानसिक व शारिरीक छळ करून अंगावरील दागिने काढण्यात आल्याने विवाहितेच्या पतीविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरजान इकबाल खान रा.शेख रज्जाक पार्क शहादा मस्जिद हिचे सुरत येथील युवकाशी लग्न झाले होते.

सदर युवकाने लग्नानंतर विवाहितेला दोन लाख रूपये ऑफीस टाकण्यासाठी व कॉम्प्युटर घेण्यासाठी माहेरून 2 लाख रुपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केला व विवाहितेचा अंगावरील दहा ग्रॅम सोन्याची पोत, पाच ग्रॅम कानातील रिंग व पायातील 15 भार वजनाचे चांदीचे चाळ हिसकावण्यात आले.

याबाबत शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून इकबाल खान हुसमान खान पठाण रा.आमलीपुरा रानदेर सुरत याच्याविरुद्ध भादंवि 498 (अ), 406, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना बुवा करीत आहेत.

LEAVE A REPLY

*