निवडणुकीवर भारी पडली नोटाबंदी : नोटाबंदीच्या काळात पावणे तीन कोटी तर निवडणूक काळात सव्वा कोटी मालमत्ता कर वसुली

0

महेश पाटील,नंदुरबार । नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांना पालिकेचे मालमत्ता कर निरंक करावा लागतो.

त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी आपल्याकडे असलेली मालमत्तेची थकबाकी भरुन पालिकेच्या तिजोरी भरली आहे. परंतु मागीलवर्षी झालेल्या नोटाबंदीच्या काळात जुन्या हजार व पाचशेच्या नोटा भरुन नागरिकांनी तब्बल 2 कोटी 74 लाख करवसुली झाली होती.

तर यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात 1 कोटी 12 हजार 80 हजार जमा झाले आहेत. त्यामुळे निवडणूकीवर नोटाबंदी भारी पडल्याचे दिसून आले आहे.

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करतांना पालिकेचे विविध कर भरल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

त्यानंतर तो अर्ज दाखल करण्यास पात्र असतो. नंदुरबार पालिकेची सार्वत्रिक निवडणुक लागण्यापुर्वी इच्छुक उमेदवारांनी आपआपले मालमत्ता कर नरगपालिकेत भरले.

नोव्हेंबर महिन्यात एकूण 1 कोटी 12 लाख 80 हजार रूपाये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मागील वर्षाच्या 2016-17 तुलनेत सप्टेंबर मध्ये 10 लाख 87 हजार, ऑक्टोंबरमध्ये 15 लाख 5 हजार तर 2017-18 मध्ये सप्टेंबर महिन्यात 33 लाख 72 हजार, ऑक्टोंबर महिन्यात 17 लाख 94 हजार रूपये नगरपालिकेतील तिजोरीत नळपट्टी व घरपट्टीसाठी भरण्यात आले.

पालिकेच्या मालमत्ता करातील चार प्रकारचा कर हा पालिकेच्या तिजोरीत जमा होत असतो. त्यात पाणीपट्टी, घरपट्टी, स्वच्छताकर, ड्रेनेजकर तर संबंधित विभागाला विशेष शिक्षणकर, रोजगार हमी कर, महाराष्ट्र शिक्षण कर, मालमत्ता कर हा शासनाचा तिजोरीत पालिकेला जमा करावा लागतो.

नोटाबंदी काळात जस्त करभरणा
केंद्र सरकारने मागील वर्षी दि.8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात एक हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.

त्यामुळे नागरीकांकडे असलेल्या हजार व पाचशे रूपयांच्या नोटा जमा करण्यासाठी नागरीकांनी पालिकेकडे भरण्यासाठी धाव घेतली होती.

त्यामुळे मागील वर्षी नगरपालिकेत नोव्हेंबरअखेर या एका महिन्यात मालमत्ता कराच्या पोटी 2 कोटी 74 लाख रूपये जमा करण्यात आले होते.

त्यातुलनेत निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून मालमत्ताकर भरण्याचे प्रमाण जास्त असेल अशी अपेक्षा नगरपालिकेला होती.

परंतु नोव्हेंबर 2017-18 मध्ये पालिकेच्या तिजोरीमध्ये 1 कोटी 12 लाख 80 हजार रूपये जमा आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 1 कोटी 62 लाख रूपये नगरपालिकेच्या तिजोरीत कमी आले. यावरून निवडणुकीच्या कालावधीपेक्षा मागील वर्षी झालेल्या नोटाबंदी अधिक प्रभावी ठरल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

*