नंदुरबार जिल्ह्यात नगराध्यक्षपदाचे 23 उमेदवार !

0

नंदुरबार । दि.25 । प्रतिनिधी-नंदुरबारसह नवापूर व तळोदा पालिका निवडणूकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जांची आज छाननी करण्यात आली.

या छाननीत तीनही पालिकांमधील नगराध्यक्षपदाचे 10 तर नगरसेवकपदाचे 148 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात नगराध्यक्षपदासाठी 23 तर नगरसेवकपदासाठी 302 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नंदुरबारसह नवापूर व तळोदा पालिकांच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरु आहे. दि. 18 ते 24 नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती.

या मुदतील नंदुरबारात नगराध्यक्षपदासाठी एकुण 16 तर नगरसेवकपदासाठी एकुण 238 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

आज या अर्जांची छाननी करण्यात आली. यात वेगवेगळया कारणांमुळे नगराध्यक्षपदाचे 3 अर्ज तर नगरसेवकपदाचे 105 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.

नवापूर पालिकेत नगराध्यक्षपदासाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 4 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने आता 6 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नगरसेवकपदासाठी 148 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 35 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने आता 113 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तळोदा पालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 3 अर्ज बाद करण्यात आल्याने 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवकपदासाठी 64 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 8 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने 56 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

LEAVE A REPLY

*