दोन्ही पक्षांकडून होतेय प्रचार रॅलीतील गर्दीची तुलना

0

महेश पाटील,नंदुरबार । दि.26-नंदुरबार नगरपालिकेसाठी काँग्रेस व भाजपाने शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही पक्षांतर्फे प्रचार रॅलीतील गर्दी तुलना करण्यात येत असून त्यावर विजयाचा दावा केला जात आहे.

निवडणुक म्हटली म्हणजे, गट तट, हेवे दावे, पक्षांत्तर आलेच. आज एका पक्षाच्या झेंडा हातात घेणारे कार्यकर्ते उद्या विरोधी गटात दाखल होत असतात.

त्यामुळे राजकारणात कोणीही कायमचा शत्रु किंवा कायमचा मित्र नसतो. कार्यकर्त्यांनी याची जाणीव ठेवून प्रचार यंत्रणा राबविली पाहिजे.

नंदुरबार शक्ती प्रदर्शन
नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून नंदुरबार पालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी 16 अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदासाठी 39 जागांसाठी 238 अर्ज दाखल करण्यात आले आहे. पालिकेसाठी या निवडणुकीत प्रमुख लढत काँग्रेस व भाजपात होणार आहे. दि.23 नोव्हेंबर रोजी काँग्रेस तर दि.24 नोव्हेंबर भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले. दोन्ही पक्षांकडून रॅली काढण्यात येवून मोठया संख्येने समर्थकांची गर्दी जमविण्यात आली. अर्ज दाखल झाले असले तरी दि.30 नोव्हेंबर रोजी माघारीअंती प्रत्यक्ष कोणाची कोणासमोर लढत होईल, ते स्पष्ट होणार आहे.

दावे प्रतिदावे
दोन्ही प्रमुख पक्षांच्या समर्थकांमध्ये निघालेल्या रॅलीबदल चर्चा होत असून आमच्या रॅलीत समर्थकांची संख्या जास्त होती. याबाबत दावे केले जात आहे. त्यासोबत आक्रमक प्रचार करीत मिरवणुकीच्या गर्दीवरून एकमेकांना हिणवण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे. राजकीय पक्षातर्फे नेत्यांबदलचे गाणे ध्वनिक्षेपकावरून वाजविले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत आहे. मदत होत असली तरी पक्षाचे समर्थक आक्रमकपणे समर्थनाचे विषय मांडत एकमेकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे.

नागरीकांमध्ये चर्चा
नगरपालिकेसाठी मतदान 13 डिसेंबर रोजी होत आहे. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. त्यात प्रमुख पक्षांतर्फे आलेल्या मिरवणुकीतील संख्या लक्षणीय होती. या संख्येबाबत नागरीकांमध्ये कोणाचा रॅली किती संख्या होती. रॅली कशी निघाली. याबाबतीत दबक्या आवाज चर्चा करण्यात येत आहे. नागरीक निवडणुकीची चर्चा करीत असतांना स्वतःचा तोल जाणार नाही व आपला कल कोणाकडे आहे. हे कोणाला कळु नये, याची काळजी घेत असतांना निघालेल्या रॅलीत व विजयाचे गणित त्यांच्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विविध पक्षातील उमेदवारांचे समर्थ विरोधी पक्षातर्फे उमेदवारी करीत असलेल्या उमेदवारास व विरोधी पक्षाच्या समर्थकांना हिणवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दखी का गर्दी राहशी का उभी, अशा प्रकाराने आपल्या नेत्याचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकारण हे केवळ पक्षाच्या मोठया नेत्यांमध्ये केले जाते.

मात्र मोठया नेत्यांपेक्षा लहान कार्यकर्तेच या नेत्यांवर खुन्नस काढतांना दिसतात. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रु किंवा कायमचा मित्र नसतो.

त्यामुळे मोठे नेते कधीही कोणाशी हातमिळवणी करून घेतात. मात्र, नंतर कार्यकर्त्यांची गोची होते. केवळ विरोधी पार्टीचा समर्थक आहे, म्हणून त्याला न डिवचता खेळीमेळीच्या वातावरणात प्रचार व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरीकांमधून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*