शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍यास लूटले 21 हजाराची मुद्देमाल लंपास; तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा

0

नंदुरबार । प्रतिनिधी-अज्ञात तिघांनी शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍यास रस्त्यात अडवून रोख रक्कमेसह मोबाईल असा 21 हजाराचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटल्याची घटना नंदुरबार, खांडबारा रस्त्यावरील भादवड गावाजवळ घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील जामा मशिदीजवळ राहणारे व्यापारी एजाजखान शेरखान पठाण यांना तीन अज्ञातांनी रस्त्यात अडवून त्यांच्याजवळील 9 हजार 500 रूपयांची रोख रक्कम, 8 हजार 500 रूपयांचे सॅमसंग कंपनीचे दोन माोबाईल, 500 रूपये किंमतीचा नोकिया कंपनीचा एक मोबाईल, 500 रूपये किंमतीचा मायक्रोमॅक्स कंपनीचा एक मोबाईल 2 हजार रूपये किंमतीचा बायोमेट्रीक डिवाईज, 725 रूपये किंमतीचे वोडाफोन सिमचे रिजार्च व्हाऊचर व आठ वोडाफोन सीमकार्ड असा एकूण 31 हजार 825 रूपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेवून पळून गेले.

ही घटना दि.23 रोजी सायंकाळी 6.50 वाजेच्या सुमारास नंदुरबार- खांडबारा रस्त्यावरील भादंवड गावाजवळ घडली. याबाबत व्यापारी एजाज खान शेरखान पठाण यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तिघांविरूध्द भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*