भाजपाचेही शक्तीप्रदर्शन

0

नंदुरबार । प्रतिनिधी-येथील पालिकेच्या निवडणुकीच्या आज भारतीय जनता पार्टीनेदेखील आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी डॉ.रविंद्र चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.

येथील मोठा मारुती मंदिरापासून सकाळी 11 वाजता वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक इच्छूक उमेदवार आपापल्या प्रभागातून मिरवणूकीने ढोलताशाच्या गजरात येवून मोठा मारुतीजवळ जमत होता.

यावेळी भाजपातर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सकाळी 10.30 वाजेदरम्यान मिरवणूकीस सुरूवात झाली. रॅली शिवाजी रोड, जळकाबाजार, सराफ बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर, शिरीषकुमार स्मारक, बालाजीवाडा हाटदरवाजा, नेहरु पुतळा, उड्डाणपुलावरून तहसील कार्यालय येथे नेण्यात आली.

नगराध्यक्षांसह सर्व उमेदवार जमा झाल्यानंतर तहसिल कार्यालयावर मिरवणूक नेण्यात आली. या मिरवणूकीत ढोल, ताशांचा गजर करण्यात आला.

पक्षाचे झेंडे, स्कार्प, पक्षाचे चिन्ह, भाजपाचे गाणे वाजविण्यात येते होते. या मिरवणूकीमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळ वळविण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे नगराध्यक्षपदासाठी डॉ.रविंद्र चौधरी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.

यावेळी खा.डॉ.हीना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, आ.शिरीष चौधरी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, आरपीआयचे सुभाष पानपाटील, पुखराज जैन, मोहन खानवाणी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मथुरे, नितीन चव्हाण व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

*