शेवटच्या दिवशी तळोद्यात उमेदवारी अर्जाचा पाऊस

0

तळोदा/मोदलपाडा । श.प्र./वार्ताहर-तळोदा नगरपालिकेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष यांच्यासह 51 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून दोन व भाजपाकडून एक अर्जाचा समावेश आहे. दरम्यान काँग्रेस व भाजपातर्फे शहरातून सवाद्य मिरवणूक काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज दि.24 रोजी शेवटचा दिवस होता.त्यामुळे शेवटच्या दिवशी काँग्रेस,भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व अपक्ष यांच्याकडून एकूण 50 इच्छुक उमेदवारांनी नामनिर्दशनपत्र दाखल केलेत.

काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून भरत बबनराव माळी, रोहित भरत माळी,असे दोन व भाजपातर्फे अजय छबुलाल परदेशी यांचा एक नामनिदर्शनपत्र दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्य व पारंपारीक प्रतिस्पर्धी असणार्‍या काँग्रेस व भाजप पक्षाच्या वतीने शहरातून वाजत-गाजत मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. भाजपाकडूनदेखील मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

काँग्रेसच्या वतीने गणेश व्हिडीओ येथील जनसंपर्क कार्यालयापासून, मेन रोड, भोई गल्ली, मराठा चौक, शनीगल्ली, मगरे चौक अशी रॅली काढण्यात आली.

यावेळी माजी पालकमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत माळी, रोहिदास पाडवी, नंदूगिर गोसावी, संजय वाणी, माजी जि. प.सदस्य दिवाकर पवार, माजी सभापती आकाश वळवी,जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश इंद्रजित,पं.स. सीताराम रहासे, भूषण मोगल, माजी नगरसेवक पंकज राणे,माजी जि.प.सदस्य धनसिंग ठाकरे, उपसभापती दिपक मोरे आदी उपस्थित होते.

भाजपातर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत आ.उदेसिंग पाडवी, शहादा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, प्रदीप करपे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय परदेशी, माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सदस्य नागेश पाडवी, विश्वास मराठे, शहराध्यक्ष हेमलाल मगरे, नितीन पाडवी, प्रभाकर चौधरी, प्रदीप शेंडे, आनंद सोनार,दीपक चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे हरीश साळुंखे ,शरद मिस्तरी, आनंद सोनार, अनुप उदासी यांच्यासह सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते. शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी -माळी भरत बबनराव ( काँग्रेस), परदेशी अजय छबुलाल ( भाजपा) , माळी रोहित भरत ( काँग्रेस) यांनी नामांकन दाखल केले.

प्रभागनिहाय नगरसेवकपदाचे उमेदवार असे – प्रभाग क्र.1. अ. ठाकरे रामानंद शिरीषकुमार (भाजपा), धानका सुकलाल माखा ( राष्ट्रवादी), प्रभाग.1 ब. – माळी प्रभावती धरमदास्। ( काँग्रेस), चौधरी भाग्यश्री योगेश ( भाजपा), चौधरी प्रिती मुकेश (भाजपा), माळी योजना भरत (काँग्रेस), माळी प्रतिभा दगुलाल (काँग्रेस). प्रभाग 2 अ – पिपळे उद्धव राजाराम (राष्ट्रवादी), क्षत्रिय हितेंद्र सरवरसिंग (काँग्रेस), बैसाणे स्वप्नील वसंत (भाजपा), प्रभाग 2 ब- परदेशी अनिता संदीप (काँग्रेस), चौधरी दिपमाला विवेक (शिवसेना), पिंजारी गुलशनबी सरवर (भाजपा). प्रभाग 3. अ- पाडवी बेबीबाई हिरलाल (भाजपा), 3 ब माळी निमेश चंद्र मगनलाल ( शिवेसेना) (अपक्ष), 3 ब. येवले भूषण रमेश (अपक्ष ), 3.ब -माळी निमेशचंद्र मगनलाल (अपक्ष). प्रभाग क्र.4. अ. – कुरेशी हाजराबी रइस (काँग्रेस), भोई शोभाबई जालंधर (भाजपा), प्रभाग 4 ब. भोई चंद्रकांत दशरथ (राष्ट्रवादी ), 4.ब. शेख आमानुद्दीन फकरूद्दीन (भाजपा) .
प्रभाग क्र.5. अ. – पाडवी सुरेश महादू (भाजपा), प्रभाग 5.ब. माळी प्रभावती धरमदास (काँग्रेस), 5.ब. शेंडे अंबिका राहुल (भाजपा). प्रभाग क्र.6.अ. – वळवी रजूबाई मधुकर (राष्ट्रवादी), 6.अ. पाडवी सविता नितीन (भाजपा), प्रभाग क्र.6 ब. सूर्यवंशी कल्पेश मनोहर (अपक्ष), 6.ब. मगरे हेमलाल पुरूषोत्तम (भाजपा), 6.ब. चौधरी सुभाष धोंडू (काँग्रेस). प्रभाग क्र.7.अ. नाईक नरोत्तम वासुदेव (राष्ट्रवादी), 7.अ. पाडवी योगेश प्रल्हाद (भाजपा), 7.अ. पाडवी भांग्या शिंगी (काँग्रेस), प्रभाग क्र. 7 ब. उदासी सुनैना अनुपकुमार उदासी (उदासी), 7 ब. पाटील कल्पना देवेंद्र ( शिवसेना). प्रभाग क्र.8. अ. माळी सूरज रमेश (अपक्ष), 8.अ. सोनार आनंदकुमार महेंद्र (भाजपा), प्रभाग क्र.8. ब. मगरे वत्सला रमेश (राष्ट्रवादी), 8.ब. माळी शर्मिला मोहन (भाजपा), प्रभाग क्र.9.अ. वळवी शिल्पा संदीप (राष्ट्रवादी), 9 अ. प्रधान रंजिता अविनाश (भाजपा), 9.अ. पाडवी गीता मोहन (शिवसेना), प्रभाग क्रं.9.ब. सूर्यवंशी किरण अशोक (भाजपा), 9.ब. माळी संजय बबनराव (काँग्रेस), 9.ब. माळी हिमांशू संजय (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*