सारंगखेडा चौफुलीवर अवैध लाकूड जप्त

0
शहादा / तालुक्यातील सारंगखेडा-कळंबू रस्त्यावरील चौफुलीवर आज पहाटे अवैध जळावू व इतर लाकूड घेवून जाणार्‍या वाहनाला वनविभागाने साफळा रचून पकडले आहे.
यात सुमारे 3 लाख 10 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील कळंबू येथून जळाऊ व लिंब इमारती लाकुड विना परवाना अवैधमार्गे वाहतूक होत असल्याची माहिती शहादा वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक पी.पी. सुर्यवंशी यांना मिळाली होती.
त्यांनी त्वरीत शहादा वनक्षेत्रपाल ए.जे. पवार, जयनगर वनपाल आर.पी. शेहीकर यांना भ्रमणध्वनीने संपर्क करीत घटनेची माहिती दिली. त्यानुसार बुधवारी दुपारनंतर वनक्षेत्रपाल यांनी वनरक्षक कर्मचारी यांच्या सहकार्याने सारंगखेडा-कळंबू-कोठली-टाकरखेडा-टेंभा यांसह सर्वच रस्त्यावर सापळा रचला.
या घटनेची चाहूल अवैध लाकुड वाहतुक करणार्‍यास लागली. त्यामुळे त्यांनी दिवसभर वाहन जागेवरून हलवले नाही. परंतू आज पहाटे तीन-चार वाजेच्या सुमारास कोणीही नसणार या इराद्याने ट्रक चालकाने तेथून ट्रक हलविला.
परंतू साडेतीन-चार वाजेच्या सुमारास जळाऊ लिंब ईमारती लाकुड भरून चाललेला ट्रक (क्र.एम.एच., जी.6322) हा सारंगखेडा-कळंबू रस्त्याच्या चौफुलीवर येताच रात्रभर गस्तवर असलेल्या वनविभागाच्या चालकांनी ताब्यात घेत ट्रक शहादा-दोंडाईचा रोडलगत वनविभाग कार्यालयात जमा केला आहे.

या ट्रकमध्ये लिंब इमारतीचे 5.100 घनमीटर लाकुड व जळाऊ 4.500 घनमीटर असा एकूण 9.600 घनमीटर लाकुड सुमारे 40 हजार 700 लाकूड होता. 2 लाख 70 हजार रुपयांचा ट्रक असा एकूण 3 लाख 10 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

LEAVE A REPLY

*