अस्वलाच्या हल्ल्यात रखवालदार गंभीर जखमी

0

मोदलपाडा, ता.तळोदा । दि.23 । वार्ताहर-तळोदा तालुक्यातील प्रतापपूर गावालगत असणार्‍या केळीच्या शेतात रखवालदारावर अस्वलाने केलेल्या हल्लयात रखवालदार गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना आज दि 23 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. तळोदा तालुक्यातील प्रतापपूर गावालगत असणार्‍या छोटू रामसिंग राजपूत या शेतकर्‍याच्या शेतात केळीच्या पिकाला रखवालदार ब्रिजलाल ओंकार वळवी (वय 65) हे पाणी देत होते.

शेतात पिकाला पाणी देत असतांना अचानक जवळील बटेसिंग अजबसिंग राजपूत याच्या शेताचा तार कंपाऊंड जवळून अस्वल निघाले. त्याने रखवालदार ब्रिजलाल वळवी यांच्यावर हल्ला चढविला.

अस्वलाने केलेल्या या हल्ल्यात रखवालदार ब्रिजलाल वळवी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अस्वलाने त्यांच्या तोंडाचे लचके तोडले आहे.

नाकाला देखील गंभीर दुखापत झाली आहे. नाक पूर्णपणे दुभंगलेले आहे.जखमी ब्रिजलाल वळवी यांच्यवर प्रतापपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ दाखल करण्यात आहे.

तेथील वैद्यकीय अधिकारी कांतीलाल पावरा यांनी प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*