काँग्रेसतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन

0

नंदुरबार । प्रतिनिधी-येथील पालिकेच्या निवडणुकीच्या आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.

येथील आमदार कार्यालयापासून सकाळी 11 वाजता वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक इच्छूक उमेदवार आपापल्या प्रभागातून मिरवणूकीने ढोलताशाच्या गजरात येवून आमदार कार्यालयाजवळ जमत होता.

यावेळी कॉग्रेसतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शहरातील आमदार कार्यालयाजवळ काँग्रेसचे समर्थक जमण्यास सकाळी 8 वाजेपासूनच सुरूवात झाली. सकाळी 10.30 वाजेदरम्यान आमदार कार्यालयाजवळून मिरवणूकीस सुरूवात झाली.

रॅली नगरपालिकेजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून शिरीष कुमार स्मारक, गणपती मंदिर, सोनार खुंट, हाटदरवाजा उड्डाणपुलावरून तहसील कार्यालय येथे नेण्यात आली.

नगराध्यक्षांसह सर्व उमेदवार जमा झाल्यानंतर तहसिल कार्यालयावर मिरवणूक नेण्यात आली. या मिरवणूकीत ढोल, ताशांचा गजर करण्यात आला.

पक्षाचे झेंडे, स्कार्प, पंजाचे चिन्ह, काँग्रेसचे गाणे वाजविण्यात येते होते. या मिरवणूकीमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळ वळविण्यात आली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी, मनोज रघुवंशी, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, कुणाल वसावे, दीपक कटारीया, सुभाष राजपूत, राम रघुवंशी, लकी रघुवंशी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मथुरे, नितीन चव्हाण व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

*