तळोद्यात नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकपदासाठी 20 नामांकन दाखल

0

मोदलपाडा । वार्ताहर-तळोदा पालिका निवडणुकीत आज नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकपदासठी 19 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

आतापर्यंत एकूण 20 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले आहेत. आज शिवसेनेतर्फे चार उमेदवारानी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांचे दोन अर्ज, देवेश पन्नालाल जोहरी यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला. प्रभाग एक अ मध्ये अरविंद मधुकर पाडवी, प्रभाग तीन अ पाडवी पार्वतीबाई जयराम, ब-सुनील नामदेव मराठे, प्रभाग चार ब- शेख इमरान लियाकत, महेंद्र हिरालाल, बागुल, सय्यद इंद्रिस अली अब्बास अली. प्रभाग पाच अ- ठाकरे प्रकाश मिर्‍या, पाडवी योगेश रघुनाथ, ब – अपर्णा अनिल माळी, प्रभाग सहा अ- पाडवी आश्विनी गोविंदा, ब-वंजारी विनोद पांडू, प्रभाग आठ अ -वाणी गौरव देवेंद्रलाल, ब- ठाकूर प्रतीक्षा वाल्मिक (दोन अर्ज), ब- चव्हाण वैशाली अंबालाल, प्रभाग नऊ अ पाडवी कल्पना सतीवान.

तळोदा पालिका निवडणुकीत आज शिवसेनेकडून चार शिवसेनेच्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. दुपारी 1 वाजेच्या सुमारास सवाद्य दत्तमंदीर पासून मिरवणूक काढून नामनिर्देशन पत्र भरण्यात आले.

शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये विनोद वंजारी , शेखइम्रान प्रभाग, प्रतीक्षा ठाकूर प्रभाग गिता पाडवी यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे, आमशा पाडवी, सहसंपर्कप्रमुख संजय उकिरडे, प्रभारी तालुकाप्रमुख प्रकाश कुलकर्णी, जेष्ठ शिवसैनिक संजय पटेल, जितेंद्र दुबे, विपुल कुलकर्णी, जगदीश चौधरी आदी उपस्थित होते.

शिवसेनेकडून शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांच्या कुटूंबातून प्रथमच उमेदवारी होत असून मागील 18 वर्षापासून ते सेनेत सक्रीय शिवसैनिक आहेत. त्यांच्या पत्नी प्रतीक्षा ठाकूर या उमेदवारी करत आहेत.

दरम्यान काँग्रेस व भाजप व इतर उमेदवार कडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी मध्यवर्ती इमारतीत मोठ्या प्रमाणावर संभाव्य गर्दी पाहता उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिक कर्मचारी उपलब्ध करणार असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*