प्रा.डॉ.गिरासे यांना ‘भारत विद्यारत्न’ पुरस्कार

0

नंदुरबार । दि.23 । प्रतिनिधी-तळोदा महाविद्यालयातील माजी, वाणिज्य विभाग प्रमुख आणि आर.एम.डी.महाविद्यालय शहाद्याचे माजी प्राचार्य डॉ.एस.पी. गिरासे यांना इंटरनॅशनल बिजनेस कौन्सिल दिल्ली या संस्थेने या वर्षाचा ‘भारत विद्यारत्न’ हा पुरस्कार दिल्ली येथे आसाम आणि इतर सहा राज्याचे माजी राज्यपाल भिष्म नारायणसिंह यांच्या हस्ते आणि बँगलोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.के.रविंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

प्रा.डॉ.गिरासे यांना वाणिज्य विद्याशाखेसाठी 12 वी ते एम.ए.कॉम. पदवीपर्यंत 32 पुस्तकांचे लिखाण केलेले असून त्यांच्या सर्वच पुस्तकांना विद्यापीठाने क्रमीक पुस्तकांचा दर्जा दिला आहे.

त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनात्मक मोठ्या संख्येने प्रकाशित झाले आहेत. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनात पाच विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केलेली असून चार विद्यार्थी पी.एच.डी.चे मार्गदर्शन घेत आहेत.

पुणे आणि उमवि जळगांव या विद्यापीठात वाणिज्य विद्याशाखेच्या विविध समित्यांवर महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तसेच जिल्हास्तरावरील डी.पी.ई.पी. आणि सर्व शिक्षण अभियान या समित्यांवर सतत दहा वर्ष अशासकीय तज्ञ सदस्य म्हणून योगदान दिलेले आहे. या समित्यांवर कार्यरत असतांना 36 शिक्षकांच्या कृती संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन केले आहे.

यू.जी.सी. दिल्ली या संस्थेच्या आर्थिक सहकार्याने दोन लघू संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. तसेच धुळे आणि जळगांव नभोवाणी केंद्रावर आदिवासींच्या जीवनावर अनेक संशोधनपूर्ण व्याख्याने झालेली आहेत.

यापूर्वी देखील प्रा.डॉ.गिरासेंना महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट वाणिज्य लेखक पुरस्कार आणि बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित केले आहे.

तसेच तळोदा येथील ज्येष्ठ नागरीक संघाच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे. सेवानिवृत्तीनंतरदेखील पुस्तक लिखाण आणि संशोधन क्षेत्रात आजदेखील त्याच उत्साहाने कार्यरत आहेत.

प्रा.डॉ.गिरासेंच्या कार्याची दखल घेवून दिल्ली येथील इंटरनॅशनल बिजनेस कौन्सिल या संस्थेने ‘भारत विद्यारत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. याबाबत प्रा.डॉ.गिरासेेंचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

*