सोनगीर टोल कर्मचार्‍याने फोडली गाडीची काच

0

कापडणे । दि.22 । प्रतिनिधी-मुंदाणे (ता.पारोळा) येथील शेतकर्‍याचा कापुस घेऊन जाणार्‍या गाडीवर अचानक हल्ला करत गाडीचा काच फोडल्याची घटना आज (दि.22) सोनगीर टोल प्लाझावर घडली.

कोणत्याही प्रकारचे कारण नसतांना सरळ दगडाने काच फोडल्याने गाडीचे 17 हजाराचे नुकसान झाले आहे. टोलच्या सबंधित कर्मचार्‍याविरुध्द सोनगीर पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली असुन या निमित्ताने पुन्हा एकदा टोलवरील दादागिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हा विषय दडपण्यासाठी व तक्रार दाखल होऊ नये म्हणुन पुरेपुर प्रयत्न झाल्याचेही समजते, यासाठी मोठमोठ्या व्यक्तींकडुन शब्द टाकण्याचाही प्रयत्नही झाला. परंतू सबंधित गाडी मालक व चालक हे तक्रार दाखल करण्याच्या मतावर मात्र ठाम असल्याचे समजते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंदाणे येथील भास्कर जयराम पाटील या शेतकर्‍याचा कापुस भरुन नाना मडकु पाटील आपल्या ट्रकने (एमएच 18 बीजी 0618) गुजरात राज्यात विक्रीसाठी जात होते.

आज (दि.22) सायंकाळी 6:44 वाजेच्या सुमारास नाना धुडकू पाटील यांनी सोनगीर टोलवर 195 रुपयाची रीतसर पावती फाडली. यानंतर गाडी टोलच्याच वजन काट्यावर गेली असता गाडी चालक नाना पाटील यांनी किती वजन आले अशी टोल कर्मचार्‍याकडे विचारणा केली असता त्याने सरळ ट्रकच्या काचेवर दगड मारल्याचे व त्यामुळे 17 हजार किमतीची काच मुटल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ड्रायव्हर व मालक नाना मडकू पाटील (मुंदाणे ता.पारोळा जि.जळगांव) यांच्या तक्रारीवरुन सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे सुरु होते. या निमित्ताने टोलवर होणार्‍या दादागिरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावर पायबंद घालण्याची मागणी जोम धरु लागली आहे.

LEAVE A REPLY

*