आयपीएस असोसिएशनचेदत्तक गाव शिरवाडे येथे मेळावा

0

नंदुरबार । दि.22 । प्रतिनिधी-महाराष्ट्रातील आयपीएस असोसिएशनने तालुक्यातील शिरवाडे हे गाव दत्तक घेतले आहे. या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पाहणी दौरा करून मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.

पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पेालीस अधिक्षक प्रशांत वाघुंर्डे, पोलीस उपअधिक्षक विजय सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांच्यासह पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलीस अधिकार्‍यांनी ग्रमास्थांसोबत संवाद साधत गावात राबविण्यात येणार्‍या विविध योजनांवर चर्चा केली. ग्रामस्थांनी गावात दारूबंदी व तंबाखूमुक्ती करण्यासाठी होणार्‍या मार्गदर्शन उपक्रमांची माहिती दिली.

पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी ग्रामस्थांनी दारूबंदीबाबत मार्गदर्शन केले. सरपंच अंजनाबाई वळवी, उपसरपंच दिपक वळवी, ग्रामसेवक राठोड यांच्यासह मुख्याध्यापक व बेडसे यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या आणि अडचणी मांडल्या. पोलीस अधिक्षक पाटील व अधिकार्‍यांनी शिरवाडे येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली.

पोलीस दलाने दत्तक घेतलेल्या या गावात येत्या वर्षभरात विविध उपक्रम होणार असून त्याअंतर्गत पोलीस अधिकारी वेळोवेळी बैठका घेणार आहे.

जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून येथे युवकांसाठी ओपन जीम तयार करण्यात येणार असून येथे पोलीस अधिकारी मार्गदर्शन करतील असेही सांगितले.

LEAVE A REPLY

*