रोलर स्केटिंग, रोलर हॉकी स्पर्धेसाठी 480 स्पर्धक

0

नंदुरबार । दि.21 । प्रतिनिधी-राज्य स्केटिंग असोसिएशन, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी व क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने के. डी. गावीत शैक्षणिक संकुल पथराई ता. नंदुरबार येथे आयोजित राज्यस्तर शालेय गटाच्या रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रभरातून एकूण 480 खेळाडू सहभागी झाले आहे.

राज्यातील दुसर्‍या व अद्यावत या ट्रॅकवर उद्या दि.22 नोव्हेंबरपासून राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांमध्ये प्रत्यक्ष धावती जंग सुरु होणार आहे.

राज्यातील दुसरे ट्रॅक ठरणार्‍या पथराईच्या अद्यावत ट्रॅकवर चार दिवसापासून सुरु असलेला अखंड सराव आज थांबला असून सकाळी 10 वाजेपासून स्पर्धकांची नोंदणी सुरु करण्यात आली.

सायंकाळपर्यंत पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, लातूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक आदी 8 विभागांमधून रोलर स्केटिंगसाठी प्रति विभाग 48 असे एकूण 384 तर रोलर हॉकी स्पर्धेसाठी प्रति विभाग 12 असे एकूण 96 असे दोन्ही स्पर्धेसाठी 480 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

स्पर्धेचे उदघाटन दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी घनश्याम राठोड, राज्य स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष पी. के.सिंग, सचिव ज्ञानेश्वर बुलंगे, लघु उद्योग फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी इलावतीताई राजेंद्रकुमार गावित, जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे सचिव नंदू पाटील, संस्थेचे अधीक्षक प्रा.भीमसिंग वळवी, करणसिंग पाडवी आदी उपस्थित राहणार आहे.

या स्पर्धेसाठी राज्यभरातून एकूण 30 पंच नेमण्यात आले आहे. स्पर्धेनिमित्त राज्यभरातून हाजारो स्पर्धक, पालक व पंच नंदुरबारात येत असून बहुतांश व्यक्ती नंदुरबारबाबत अपरिचित आहे. त्यांची ऐनवेळेस गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिकस्तरावर 17 प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहे.

निवास व्यवस्था-
स्पर्धक विद्यार्थी व त्यांचे पालक, प्रशिक्षकांसाठी के.डी. गावीत शैक्षणिक संकुलातील तिन्ही वसतिगृहात मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचठिकाणी भोजनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाहनत तळ व्यवस्था
स्पर्धेसाठी येणार्‍या प्रेक्षक व बाहेरून येणार्‍याच्या वाहनांसाठी शैक्षणिक संकुलातच (चार चाकी व दुचाकींसाठी स्वतंत्र) वाहनतळ तयार करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*