62 हजार विद्यार्थ्यांकडून गणित व इंग्रजीचे पाठांतर

0
नंदुरबार / आदिवासी एकता मानव सेवा फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी व ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कार्य केले जात आहे.
प्रशिक्षकांमार्फत जिल्ह्यातील 62 हजार 883 विद्यार्थ्यांकडून गणित व इंग्रजी विषयांचे पाठांतर करून घेतले जात आहे. या कार्याबाबत फाऊंडेशनचे कौतुक होत आहे.

जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी, यासाठी जनजागृती केली जात आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषयात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र प्रशिक्षक नेमून इंग्रजी व गणित विषयाचा अभ्यास करून घेण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*