एस.टी.आगारातर्फे चालकांची आरोग्य तपासणी

0

नवापूर । दि.20 । प्रतिनिधी-नवापूर एस.टी.आगार विभागात एस.टी.बस चालकांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी चालंकाची ब्लॅड शुगर,सी.बी.सी.,लिव्हर फंक्शन चाचणी(एल.एफ.टी.) तसेच किडनी टेस्ट,छातीचा एक्स रे, टी.बी आजार या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.

ही वैद्यकीय तपासणी गुरुकृपा हॉस्पीटल ठाणे(मुंबई) डॉ.सुशांत सपकाळ, डॉ.शशिकांत पाटील, डॉ.लक्ष्मी नारायण शहा यांनी केली.

यावेळी आगारप्रमुख राजेंद्र अहिरे,योगेश शिवदे, व्ही.एस.गावीत, व्ही.एम.गावीत, कामगार सेनेचे एस.बी.अहिरे,आर.बी.ठाकरे,संजय शिंदे,भावीन पाटील,व्ही.एस.वळवी आदी उपस्थित होते.40 वर्षावरील सर्व एस.टी.चालकांची तपासणी करण्यात आली.

यावेळी आगार प्रमुख राजेंद्र अहिरे म्हणाले सर्व चालकांचे आरोग्य चांगले राहावे व जेणेेकरुन प्रवाशांना सुरक्षीत व निर्भय सेवा देणे शक्य होईल.

चालक वर्गाने व्यसनापासुन दुर राहीले पाहिजे, व्यसन हे आजाराला आमत्रंण देते, व्यसन हे शाप आहे, असंख्य प्रवासी यांचा जीव तुमच्या हातात असतो.

यामुळे चालक व वाहकांनी नेहमी आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन एस.बी अहिरे यांनी केले. आभार संजय शिंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*