आमचुर ब्रँडिंगसाठी निधी देणार – मुख्यमंत्री

0
नंदुरबार  /  सातपुडयात आमराई मोठया प्रमाणावर असल्याने आमचुरच्या व्यवसायाला चांगली संधी आहे.
मात्र, आमचुरचे जोपर्यंत ब्रँडींग होत नाही तोपर्यंत उत्पादकाला योग्य भाव मिळणार नाही. यासाठी शासनातर्फे ब्रँडींग केलेल्या आमचुरला निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दरम्यान, जिल्हयातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील सर्वच महसुली गाव व पाडयांचे मार्च 2018 अखेर विद्युतीकरण करण्यात येईल, आवश्यकता वाटल्यास मध्यप्रदेश सरकारकडून वीज विकत घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे आज दि. 17 रोजी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले होते.

या दौर्‍यात त्यांनी अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील मोलगी तसेच राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी येथे प्रत्यक्ष जावून विविध विकास कामांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पोषण पुनर्वसन केंद्रातील कुपोषित बालकांची पाहणी केली.

त्यानंतर या केंद्राच्या आवारात वृक्षारोपण केले. तेथून भगदरी या गावाला भेट दिली.

तेथील एका आदिवासी शेतकर्‍याच्या बांधावर आणि घरात जावुन संवाद साधला. त्याच्याकडील आमचुर उद्योगाची माहिती जाणून घेतली.

 

LEAVE A REPLY

*