नंदुरबारला कॉंग्रेस-सेनेची अधिकृत युती जाहीर

0
नंदुरबार |  प्रतिनिधी :  येत्या नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि शिवसेना युती करुन लढतील अशी अधिकृत घोषणा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.चंद्रकांत रघुवंशी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून केली. जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांची बोलणी सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

येत्या महिन्यात होवू घातलेल्या नगरपालिका निवडणूकीत कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात युती झाल्याची चर्चा होती. आ.रघुवंशी व डॉ.विक्रांत मोरे यांच्या युतीबाबत चर्चा बैठकाही झाल्या.

परंतु अधिकृतरित्या युती जाहीर करण्यात आलेली नव्हती. आज आ.रघुवंशी व डॉ.विक्रांत मोरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून नगरपालिका निवडणुकीस कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्रित युती करून लढण्याची अधिकृत घोषणा केली. शिवसेनेने ११ जागांची मागणी केली आहे.

परंतु अद्याप जागा वाटपाबाबत निश्‍चिती झालेली नसून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

डॉ.मोरे यांनी सांगितले की, नंदुरबार नगरपालिकेने गेल्या पाच वर्षात नंदुरबारचा केलेला विकास व विकासाचे व्हीजन लक्षात घेता शिवसेनेने कॉंग्रेस सोबत युती करण्याचे जाहीर केले. त्यानुसार आम्ही एकत्रित लढणार आहोत.

LEAVE A REPLY

*