नगराध्यक्षपदाचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेणार – ना.रावल

0

मोदलपाडा । दि.16 । वार्ताहर-तळोदा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत अंतीम निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेेब दानवे घेतील, अशी माहिती पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

तळोदा पालिका निवडणूक नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी निश्चितीसाठी पक्ष श्रेष्ठींच्या सूचनेनुसार तळोदा आमदार कार्यालयात पालकमंत्री ना जयकुमार रावल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण साहुजी, नंदुरबार जिल्हा भाजपा महिला आघाडी प्रभारी प्रा.डॉ.अस्मिता पाटील, आ.डॉ. विजयकुमार गावित, आ.उदेसिंग पाडवी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी आदींच्या उपस्थितीत पदाधिकर्‍यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत भाजपा पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार निश्चितीबाबतचा अहवाल प्रदेशावर पाठविण्यात येणार असून अंतीम निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील हेच घेतील, असे ना.रावल यानी सांगीतले.

आज तळोदा येथील आमदार कार्यलय येथे घेतलेल्या महत्वपूर्ण चर्चेत इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी इच्छूक तिन्ही उमेदवारांशी चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

*